पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ लो ० टिळकांचे केसरीतील लेख मोरेक्ष्वर गोपाळ देशमूख ह्यांचे हेमंतव्याख्यान वाचावें. अविवाहित राहिल्यार्ने शारीरिक व मानसिक ऱ्हास होत नाही इतकेंच नाही, तर उलट फार फायदा होतो असे उपपत्तीनें व अनेक पुरुषाच्या उदाहणानीं सिद्ध झाले आहे. प्रजोत्पादन किवा कुटुंबपोषण ह्याकडे जो शक्तिव्यय व्हावयाचा तो इतर महत्त्वाच्या कामाकडे वळल्यास फायदाच होईल हे कोणासही समजण्यासारखे आहे. मात्र नुसते लग्न न केल्याने ब्रह्मचर्य पाळल्यासारखें होते असें नाही; खरोखरच तसे वर्तन केल पाहिजे. अविवाहित राहण्याच्या मिषार्ने दररोज शुक्रवारांत शेण खाऊन आरोग्याचा, वित्ताचा व अब्रूचा सत्यानाश करण्यापेक्षां घरीं चार बायका व दहा पेोरे असलेली एक वेळ पत्करतील. लग्नाची आम्हाला इतकी जरूर पडू लागली ह्याचे कारण तें आवश्यक आहे अशी आमची समजूतच, दुसरे काही नाही. तेव्हां ती समजूत काढून टाकल्यानें आपोआप ती जरूरीही नाहीशी होणार आहे. येणेप्रमाणे केलेला शक्तिसंशय अर्थातच दुस-या कामीं लावण्यास सोपा पडेल. हल्लीच्या सुशिक्षित मंडळीला विद्येची अभिरुचि किंवा विद्याव्यासंग चालविण्यापुरती उमेद नसते असे म्हणतात कशी असेल ? दिवसभर दगदग केल्यानंतर शतावधि संसारचितानी उद्विग्न झालेल्या त्याच्या मनास क्षणभरहा विश्राति नकी काय ? ती घेऊन बिचायाने व्यासंग तो केव्हा करावयाचा ? आणि म्हणून कॉलेजातून पार झाल्याबरोबर बुके वाण्याकडे गेली तर नवल तें कोणतें ? तोच मनुष्य एकटा असता तर आपले पोट त्याला सहज कोठेही चालविता येऊन बाकी वेळ विद्या, व्यापार, सुधारणा वगरे कृत्याकडे देता आला असता. शिवाय मागे कुटुंब असलें म्हणजे धनसचय करण्याची बुद्धि होते व तेणेकरून द्रव्याशा वाढत. पण एकट्याला त्याची काही जरूर नाही. पाठीमार्गे कोणाचा पाश नसल्यामुळे उत्साह, साहस, स्वार्थनिरपेक्षता वगैरे गुणही अशा मनुष्यात जास्ती वास करितात. आमचे कारखाने व व्यापार वाढावयास दूरदेशात प्रवास करणें जरूर आहे. राजकीय हक्क संपादनासाठी पुष्कळ माणसानीं विलायतेस गेले पाहिजे. निरनिराळ्या कलाकौशल्याची माहिती संपादन करण्यास अमेरिकेंत जाऊन चारपाच वर्षे राहणारे लोक पाहिजेत. पण कुटुंबी मंडळीच्या हातून ही कामें कशी होणार ? तसेच नव्या सामाजिक सुधारणा अमलांत आणण्यास नीति, धैर्य व थेोडीबहुत बेपर्वाई पाहिजे. एकटा पुरुष तसा होऊं शकेल, कारण तो समाजावर इतका अवलंबून नसतो; पण संसारी माणसाला तें दुर्घट आहे. राष्ट्रहितासाठी अहोरात्र झटणारे पुरुष आम्हाला पाहिजे आहेत. असे पुरुष मिळण्यास त्याच्या पाठीमार्गे दुसरें कोणतेंही व्यवधान असतां कामा नये. धर्माध्यक्षांनीं लग्न करूं नये असा रोमन कॅथलिक पथांत निर्बध आहे. बौद्धांचे श्रमण व हिंदूंचे संन्यासी ह्यांनाही संसारत्याग अवश्य सांगितला आहे त्याचे बीज इंच, तेराव्या शतकात युरोपात फ्रांसिस्कन लोकाच्या व पुढे जेसुइटांच्याश्रमानें केवढीं महत्कार्ये