पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ लो० टिळकांचे केसरीतील लेख युक्तिवाद विशेष पसंत पडतो, तर धर्माभिमानी ह्मणविणारी मंडळी जुने शास्रकार सांगतील तेवढेच ग्राह्य असा आग्रह धरून बसणार. वस्तुत: दोन्ही पक्षांचा आग्रह केवळ बोलण्यापुरताच असतो; आचरण दोघांचेही एकसारखेंच; म्हणजे * मन: पूतं समाचरेत् ’ ह्या तत्त्वानुरोधानेंच असतें. प्रसंग पडला म्हणजे युक्तिवाद गुंडाळून ठेवणारी सुधारक मंडळी दृष्टीस पडते, तसे घडेोघडीं विहितभंग व निषिद्धाचरण करणारे धर्माभिमानीही शंकडे आहेत; परंतु वादपद्धति दोघांची भिन्नभिन्न असल्यामुळे आम्हालाही प्रस्तुत विषयाचे शास्त्रदृष्टया व युक्तिदृष्टया अशा दोन्ही मार्गानीं विवेचन केले पाहिजे. शिवाय प्राचीन ऋषिमत सुधारणेला आड येतें असा जो विनाकारण गैरसमज आहे तो ह्या विषयासंबंधानें तरी खोटा आहे असेंही दाखविण्यास ही चांगली संधि आहे. तेव्हां आजच्या खेपेस प्राचीनकाळीं शास्रसंमत आचार कोणता होता हें पाहूं; म्हणजे हल्लीं लोकांचे वर्तन युक्तिदृष्टया अत्यंत हानिकारक आहे इतकेंच नाहीं, तर प्राचीन शास्रकारांनाही नापसंत व म्हणून अधर्मकारक आहे असे स्पष्ट दिसून येईल. धर्मशास्रग्रंथांतून द्विजमात्राला सारख्याच योग्यतेचे सोळा संस्कार विहित असून केवळ विवाहालाच अलीकड इतकें प्राधान्य कां आले व इतरांचा बहुतेक लोप कां झाला ? ह्यातील इंगित आमच्या मतें हिंदु लोकांची व्हासकाळीं अति वाढलली विषयलंपटता हेंच असार्व. लग्नाखेरीज उपनयन मात्र कांहीं कांहीं जातींत आढळते, पण तेंही बारा वर्षाचे एका दिवसांत आटपून टाकण्यापुरतें संपुष्टांत आले आहे, व गुजराथ वगैरे प्रातांत तर त्याला मुळींच फांटा मिळाला आहे. स्रियाचे मैौंजीबंधनपूर्वी होत असे असे म्हणतात, पण तेंही लुप्त झाले. सारांश, लोकानीं संसारपाशात लवकर पडू नये एवढ्याकरितां अडथळ म्हणून हें जे विवाहाचे पूर्वी १५ संस्कार लावून दिले होते, त्या सर्वोचा लोप करून वस्तुतः कनिष्ट अशा विवाहाचेच लोकांनी स्तोम माजविलें ह्याला कारण त्यांची मानसिक अवनती व धर्मबुद्धिचा व्हास हेच असले पाहिजे. देवर्षिपितृऋणापैकीं पुत्रोत्पादन करून पितरांपासून ऋणमुक्त होण्याकरितां आयुष्य वेचणारे लोकच यज्ञानें व अध्ययनानें फिटणारी, देवाचे व ऋषीचे अशीं दुसरी दोन ऋणें अजीबात विसरून गेले. मन्वादिकांनीं गृहस्थाश्रमाची प्रौढी वर्णन केली ती याजनाध्यापनाकरितां हे विसरून शंकराचार्यानीं मंडणमिश्रांस म्हटल्याप्रमाणे मातृ-स्वसृस्थांनीं झालेल्या स्त्रियांशीं रममाण होण्यांतच लोक कृतार्थता मार्नू लागले. सारांश, प्राचीन ऋषींच्या नियमांतील मुख्य भाग टाकून आपल्या प्रखर झालेल्या विषयवासनेची यथेच्छ तृप्ति करण्यास अनुकूल तेवढाच भाग लोकांनीं उचलला; व आमची सर्व प्रकारें हल्लीं जी अवनति झाली आहे ती त्याचा परिणाम असें असून, रागतः स्वीकार केलेल्या हल्लींच्या प्रत्येक रूढीला त्या पुराणपुरुषाची संमति दाखवू पहाणे म्हणजे त्यांची थट्टा करणें नव्हे काय ? वस्तुतः स्रियांप्रमाणें पुरुषांचे लग्न अवश्य झालेंच पाहिजे अशी प्राचीन