पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह. १३७ केवळ सार्वजनिक हिताकरितां एखादी गोष्ट अमलांत आणून स्वतः अडचण सोसण्यास तयार होण्यापुरतें नैतिक धैर्य कोणाच्याच अंगीं आढळू नये हें स्वाभाविक आहे. स्रीपरुषांची योग्यता सारखी करावयाची हा सुधारांचा हेतु स्तुत्य आहे, पण तत्प्रीत्यर्थ पुरुषांप्रमाणें स्रियासही उच्छृखल करण्यापेक्षां पुरुषांच्या स्वैर वर्तनालाच थोडाबहुत आळा घालणें आधक श्रेयस्कर झाले असतें. विवाहबंधनें सैल करून आधीच बेताल झालेल्या विषयवासनेला उत्तेजन देण्यानें एखाद दुस-या व्यक्तीचे दुःख निवारण झालें तरी ती खरी सुधारणा नव्हे हें आमच्या संसारैकपरायण सुधारकांच्या लक्षांत आलें नाहीं तें ठीकच आहे. तसेच स्रीपुनर्विवाह शास्रनिषिद्ध एवढ्यावरून त्याजविरुद्ध ओरड करणाच्यांनी आपण तितकेच किंवा त्याहूनही वाईट शास्रनिषिद्ध प्रकार हरघडीं आचरीत आहों हें मनांत आणू नये हेंही त्यांच्या अप्पलपोटेपणाला अनुरूपच आहे. विधवांना शास्रकारांनीं संन्यासव्रत सांगितलें म्हणून त्यांची थेोरवी गाऊन, त्याच शास्रकारांनीं विधुराविषयीं तितकेच कडक निर्बध केले आहेत ते विसरून जाणें, व आपल्या सुनालेकींना पातिव्रत्य धर्माचा लांबलचक उपदश करून स्वतः एकामागून किंबहुना एक जिवेत असतांनाही दुस-या हव्या तितक्या बायका करणे, व इतकेंही करून धर्मरक्षणाचा आपल्याकडेच मक्ता घेऊं पाहणें त्याला अप्पलपोटेपणा म्हणू नये तर काय म्हणावें हें आम्हास समजत नाही. त्याचप्रमाणें समाजोन्नति, सुधारणा वैगरवर लांब व्याख्यानें झोडून, इंद्रियनिग्रहाचे उदाहरण घालून देण्याचा स्वत:वर प्रसंग आला कीं, भागूबाईपणा पत्करणे व आपण होऊन बालपत्नीचे लोढणें गळ्यांत अडकवून पुनः घाण्याच्या बैलाप्रमाणें कुटुबभरणात आपल्या अमेोलिक आयुष्याचा दुव्यैय करणें हेंही तितपतच निंद्य आहे. येणेप्रमाणें दोन्ही पक्ष या कामीं सारखेच दोषी असल्यामुळे कोणी कोणास हसावयास नको हें खरें; व म्हणूनच ह्या विषयासंबंधानें बहुधा हल्लीं स्तब्ध वृति दिसून येत असावी. पण देशाची खरी सुधारणा आणि उन्नति व्हावी अशी सर्वोची इच्छा असेल तर हल्लींचा प्रकार जितका लवकर बंद होईल तितका होणें इष्ट आहे, व म्हणूनच ह्या विषयास आम्हीं हात घातला. लग्न करणें हें जन्मातील मोठे कर्तव्य अशी हल्लीं सर्वोची समजूत आहे ती कमी झाल्याखेरीज ह्या बाबतीत कोणतीही सुधारणा व्हावयाची नाहीं; व चतुर्भुज बनवण्याकरिता चोरी करणे किंवा परकन्येंचा प्रतिग्रह करणें ह्यापेक्षां विष्णुस्वरूपाप्रत पावण्याचे दुसरे उत्तम मार्ग आहेत. हें तत्त्व लहानापासून थेोरापर्यंत सर्वोच्या मनांत बिंबल्याशिवाय त्यांच्याहातून कोणताही पुरुषार्थ व्हावयाचा नाहीं. तेव्हां लग्नाचे हल्लीं जें इतकें बंड माजले आहे तें कमी करणें हाच खया सुधारणेचा उपाय आहे व त्यांतच खरें धर्मरक्षण आहे असें आम्ही दाखविणार आहीं. येथे आम्हाला वर सांगितलेल्या दोनही प्रकारच्या लोकांची समजूत घालावयाची आहे. नवीन मताच्या पक्षाला טא