पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह, १३९ शास्रकारांची समजूत नाहीं. प्रत्येकाला चारी आश्रम विहित असल्यामुळे एक विवाह फार तर केला तर चालेल; पण अनेक विवाहाचा व विशेषैकरून कांहीं विवक्षित बयानंतरच्या पुनर्विवाहाचा तर त्यांनीं स्पष्ट निषेधच केला आहे; त्यावरून प्राचीन काळीं विवाहाला व तन्मूलक गृहस्थाश्रमाला फारसें महत्व देत नव्हते हें उघडच आहे. अनेकानि सहस्वाागि कुमारब्रह्मचारिणाम्। दिवं गतानि विप्राणामकृत्वा कुलसंततिम । (मनु. ५-१५९) ह्या मनुवचनांत तर विवाहाखेरीजही पुरुषार्थ किंवा स्वर्गप्राप्ति साधतां येते असें स्पष्ट सुचविले आहे.

  • ब्रह्मचर्यं समाप्य गृही भवेद् गृही भूत्वा वनी भवेद्वनी भूत्वा

प्रव्रजेत् । यदि वेतरथा ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेद् गृहाद्वा वनाद्वा ॥ (जाबा. ४) ह्या जाबालश्रुतीनेंही गृहस्थाश्रमाची म्हणजे विवाहाची मुळींच जरूर नाहीं, तर पाहिजे तेव्हां संन्यास घेता येतो असे म्हटलें आहे. इतर्केच नाहीं तर शेवटीं * यदहरव विरजेत तदहरेव प्रव्रजेत् ? अशीही अनुज्ञा दिळी अद्देि. * अनुष्ठेयं बादरायणः साम्यश्रुतेः ? व ‘ विधिर्वा धारणयत् ? (ब्रह्मसूत्र ३-४-१९-२० ) ह्या सूत्रात बादरायणाचार्यानीं हाच सिद्धात स्थापन केला आहे. तात्पर्य, गृहस्थाश्रम किंवा विवाह परमपुरुषार्थ साधनापैकीं नसल्यामुळे पुरुषांना आवश्यक नसून केवळ रागतः प्राप्त अतएव गौण आहेत. तेव्हा तीं नाहीं केलीं तरी चालतील इतकेंच नाहीं, तर त्यांच्यायोगानें दुसच्या महत्त्वाच्या कार्याला प्रतिबंध होत असला तर मुळींच करूं नये. * यदहरेव विरजेत् ? ह्या वाक्यांनी हेंच सूचित केले आहे व म्हणून प्राचीन ऋषिवर्याना संमत असा उत्तम पक्ष म्हटला म्हणजे आमरण ब्रह्मचर्य किंवा संन्यास होय. विवाहाला फारसें महत्त्व दिलेले नाहीं. अगदीच नाहीं असें आमचे म्हणणें नाहीं, गृह्स्थ उच्यते श्रेष्ठः स त्रीनेतान् बिभर्ति ह्नेि (मनु. ६-८९) वगैरे ठिकाणीं त्यानीं त्याची थोरवीही गाईली आहे. पण त्याचे कारण अर्थात् तेव्हांची विशेष प्रकारची लोकस्थिति होय हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. देशाच्या मानानें लोकसंख्या थोडी असल्यामुळे प्रजेोत्पादनाला उतजन देणें त्या वेळेस अवश्य होतें. पण आतां तशी स्थिति नाही. लोकात दारिद्य वाढत चालले असूनही गेल्या वर्षात साडेतीन कोटि प्रजा वाढली ! तेव्हां प्रजेोत्पादनाला उतेजन देण्यापेक्षां तें कमी करणेच हल्लीं आवश्यक झाले आहे व तें करण्यास विवाहच कमी झाले पाहिजेत.