पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ लो० टिळकांचे केसरींतील लेख ठेषणारी व बालविवाहावरुद्ध व्याख्यानें झेोडणारी मंडळी अलीकडे पुष्कळ निपजूं लागली आहे; पण तीच कर्मधर्मसंयोगानें एकदा या पाशांतून मुक्त झाल्यास स्वइस्तानेंच आपल्या गळ्याभेवतीं दुसरी बेडो बिनद्दिकत अडकवून घेते किंवा फार दिवस गाडीला जुपलेला बैल आपणच जं खाद्यावर घेऊं लागते, किंवा पुष्कळ वर्षे तुरुंगवास भेोगलेल्या कैद्याला मोकळ्या हवेंत चैन पडत होत नाहींसें होतें तशी तर ह्याची स्थिति होत नसेल ना ? कसेही असेो, संसाराच्या असारत्वाविषयों लांबलचक व्याख्यानें देतांना सांगणारा एखादा धमीभिमानी काय व आमच्या विवाहपद्धतींत व्यंगें काढणारा सुधारक काय, दोघेही ह्या कामीं सारखीच अतुरता दाखवितात; तेव्हां त्याबद्दल अमक्याच पक्षाला दोष न देतां आमच्यांतील एकंदर प्राचीन उदात्त गुणांचा लेोप, राष्ट्रीय अवनतीबरोबर आलेले शारीरिक व मानसिक दौर्बल्य आणि पूर्वी थोडी बहुत असलेली समाज बंधनें अजीबात तुटून गेल्यामुळे अतोनात वाढलेला उच्छृखलपणा व बेपर्वाई हींच असल्या दुष्ट चालींना अलीकडे विशेष उतजन मिळण्यास कारणें झालीं असें म्हटले पाहिजे. असेो. ह्या विषयाचा एका बाजूने विचार झाला मुख्य सिद्धाताकडे पुढच्या खेपस वळू.

  • [नंबर २ ]

पुरुषांना हवीं तितकीं लझे करण्याची मोकळीक दिल्याने, निदान लोकांची समजूत तशी झाली असल्याने तिचा कसा दुरुपयोग होऊं लागला आहे व तेणेंकरून केवळ स्रीवर्गाचेच नव्हे, तर खुद्द पुरुषाचे व त्याच्या एकंदर कुटुंबांचे किती नुकसान होत आहे ह्याचे एका तन्हेनें मागील अंकी दिग्दर्शन केलें. पण व्यक्तीपेक्षांही समाजाचे त्यापासून फारच अहित होत आहे, व म्हणून तद्विषयक निबंध केल्यानें व्यक्तिविशेषाला जरी कितीही अडचणी सोसाव्या लागल्या तरी सार्वजनिक हिताकरितां तसला निबंध करणें अत्यंत अवश्य आहे, हा आमचा मुख्य मुद्दा आहे. पुनर्विवाह म्हटला कीं विधवा डोळ्यापुढे दिसू लागतात आणि मग प्रत्येकाच्या मताप्रमाणें निरनिराळे विकार त्याच्या मनांत उद्भवतात. वैधव्यपंकांत रुतलेल्या गायींना उद्धरण्याकरितां * मनसा वाचा हस्ताभ्यां ? प्रयत्न करण्याचा एखाद्या तरतरीत सुधारणेच्छुला आवेश येतो; व बाबावाक्याला प्रमाण मानणाच्या व शास्ररूढीरूप प्राकारामार्गे दडून परपक्षावर शब्दवर्षाव करणाच्या धार्मिकमन्याकडून ‘ अब्रह्मण्यं ? * अब्रह्मण्यं ? असा ध्वनि निघूं लागतो. पण विधवाविवाहापेक्षा शतपटीनें महत्त्वाच्या दुस-या प्रकारच्या पुनर्विवाहाकडे लोकाचे लक्ष जात नाहीं. वस्तुत: ह्यांत फारसें आश्वर्य नाहीं; कारण हल्लीं सुधारणावादी काय आणि धमभिमानी काय, दोघांचेही आचरण स्वार्थदृष्टीचे आहे; तेव्हां

  • (केसरी ८ मार्च १९९२)