पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनर्विवाह. १३५ देशोन्नती वगैरे कामें कशीं पार पडणार हें दिसतेंच आहे. बायको म्हणजे एक कामशांतीचे ईश्वरानर्मित साधन व घरांत काबाडकष्ट करणारी एक मोलकरीण असे मानणारे व एकीची विल्हेवाट केली कीं लागलेच तिला पार विसरून जाऊन दुसरीबरोबर सर्व सोहाळे भेोगण्यास तयार होणारे घोडनवरे ज्यांच्यामध्यें संभावीतपणानें मिरवितात त्यानीं आपल्या मुलीबाळींचा क्रयविक्रय करणा-या व नवरा मेल्यास स्वर्गात त्याच्या उपभेागाकरितां म्हणून त्याच्या शैदेोनशें बायकांस ठार मारणाच्या रानटी लोकांस कां हसार्वे हें आम्हांस समजत नाहीं. पहिलाच प्रसंग असेल तर पुन: लग्न केलेलें एकवेळ चालेल. पण केंस पिकले,चारपाच पेरै झालीं,लेंकीसुना घरांत चांगल्या नांदत्या झाल्या अशांनाही पुनः आठदहा वर्षाच्या सुकुमार मुलीला लेंक किंवा नात म्हणून नव्हे तर सहधर्मचारिणी म्हणून माडीवर घेणें व तिच्याशीं एखाद्या अल्पवयस्क नवरदेवाप्रमाणे सर्व विलास करणे म्हणजे त्या पवित्र विवाहविधीची, त्या सहधर्मचारिणीची, आपल्या पौरुषाची व वृद्धपणाच्या अकलची निवळ थट्टा करणें नव्हे काय ? आमचे हे शब्द पुष्कळास कडू लागतील; पण आपल्या भावी स्थितीविषयीं त्यानीं थोडा तरी विचार केल्यास त्याचे मूखैपण त्यानाच कळून आल्याशिवाय राहणार नाहीं. बहुतेकाना त्याचे लवकरच प्रायश्चित्त भेोगार्वे लागते. व अतिशय पश्चात्ताप होऊं लागतो असा नित्यानुभव आहे; पण लेोकांच्या चुकावरून शाहणे न होता मेंढरांप्रमाणे डोळे झाकून त्याच खड्डयात उडी घालणार शतशः लोक आढळतात त्यांना काय म्हणावें ६ साधारण स्नेहालाही शील व्यवसायदिकाचे पुष्कळ सामथ्र्य लागतें. मग जेथ विचार, आचार, अनुभव, मनोविकार इत्यादि कोणत्याही बाबतींत ऐक्य नाहीं अशा बाला वृद्ध दंपतीमध्यें वैवाहिक संबंधासारख्या संबंधानें अत्यंत प्रेम उत्पन्न होण्याची आशा करणें वेडेपणा नाही तर काय ? आणि खरें प्रेम नसेल तर त्या करदीपिकास्थानीं झालेल्या भार्येपासून त्याला, तिला व कुटुंबातील इतर मनुष्यांना कधीही सुख व्हावयाचे नाहीं हैं अनुभवसिद्ध आहे.केवळ आपल्या सोयीखातर एका निरपराधी अज्ञान पोरीचा सर्व जन्म फुकट घालावयाचा ती जातीच, पण त्यामुळे आपल्याला काडीइतकेंहीं सुख न होतां मुद्दाम आपल्याला जबरदस्त हृद्रोग उत्पन्न करून घेऊन कण्वानें म्हटल्याप्रमाणें घरांत मोठो धेोरली कुलव्याधि आपण होऊन आणण्यासारखें होतें. असल्या विजोड संबंधामुळे नावाजलेल्या कुटुंबास कलंक लागल्याची, पूर्वी सुखासमाधानानें नांदत आलेल्या घरांत कजे व द्वेष वाढून वाताहत झाल्याची, नवराबायको, मायलेक, भाऊभाऊ वगैरेमध्यें वैमनस्ये वाढून सर्वोचीच दुर्दशा झाल्याची शतश: उदाहरणें आपल्या नजरेखालून जात असतां केवळ क्षणिक सेोयाकरिता भावा परिणामाविषयीं डोळ्यावर कातडें ओढून विवाहरूपी दुर्लघ्य पाशांत लोक पुनःपुनः पाय अडकवून घेतात त्या त्यांच्या मूर्खपणाला काय म्हणावें ? लहानपणीं आपल्या अनुमती वांचून आईबापांनी आपल्या गळ्यांत स्रीरूपी सात मणांची बेडी अडकवून दिली म्हणत त्यांना नांवें