पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अबलोन्नति लेखमाला लेख ४ था. ११९ आमच्याकडे आले आहेत. एकास तर मनूच्या वेळीं बालविवाह अमलांत होता असें जें आम्ही लिहिले होतें त्याचा बराच राग येऊन त्याने आमच्याकडे दहा पांच प्रश्नांची यादी पाठविली आहे. या पृच्छकांचा गैरसमज दूर होण्यासाठी आम्हीं प्रथमत:च असे कळवितों कीं, बालविवाह यद्यपि सिद्ध असला तरी ज्या धर्माचे व शास्त्राचे आपणांस बंधन आहे त्यात काय आचार आहेत हें समदृष्टीने आपणांस पाहिले पाहिजे. कादे खाणें वाग्भटानें हितकारक आहे म्हणून जरी सागितलें तरी तेवढ़यावरून मनूमध्यॆ कादे खाण्याचा जो निषेध आहे, त्याचा भलताच अर्थ करण्याचा अधिकार आपणांस पोचत नाहीं. मनूने निषिद्ध मानलेल्या पुष्कळ गोष्टी आज आपण करीत आहेो व त्यास सम्मत असलेल्या गोष्टी आपण सोडून दिल्या आहेत. रूढोन व देशाचारार्ने प्रायः हा भेद झाला आहे ! परंतु ह्यावरून शास्त्रार्थाची किंमत जशी कमी होत नाहीं त्याचप्रमाणे बालविवाह व्यवहार दृष्टन्या सिद्ध झाले तरी तें शास्त्रसिद्ध आहेत की नाहीत या प्रश्नाचे महत्त्व कमी होत नाही. ज्यावेळेस सर्व शास्र झुगारून देऊन आपण मन:पूत आचरण करण्यास तयार होऊ त्यावेळेस उपयुक्ततावादाची अगर व्यवहाराची एकच कसोटी आपणास पुरी होईल; परंतु हल्लींचा प्रकार तशातला नसल्यामुळे धर्मशास्त्र, व्यवहारशास्र व आचार या तिघाच्याही मदतीने प्रत्येक प्रश्नाचा विचार करून नंतर त्यातून जो मथितार्थ निघल तीच आपणास ग्रहण कला पाहिजे. कधीं वैद्यकादि व्यवहारशास्त्राची धाव पुढे जाईल व कधी कधी आचार या दोहींसही मागे टाकील. तेव्हा या तिन्ही गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार करून नंतर त्याच्या एकवाक्यतन जेो शिष्टाचार निधेल तोच स्थाईंक सुधारणेस कारणीभूत होईल. रा. ब. वैद्य यानीं बालविवाहाचा अशाच रितीने विचार केला आहे हे पाहून आम्हास आनंद वाटतो. अबलोन्नतिलेखमालेच्या तिसच्या लेखात बालविवाहापासून होणारे दुष्परिणाम चितामणरावानीं दाखविले आहेत. आजच्या लेखात शास्रास धरून या कामीं आपले पाऊल किती पुढे पडण्याचा संभव आहे याचा नीट विचार केला आहे. त्या दोन्हीही लेखातील गोष्टीचा विचार करून जी मार्ग निघल तोच खरा. आता या लेखातील शास्रार्थाकडे वळू. या लेखात * बालविवाह शास्रसंमत नाहीं ’ हें प्रतिपाद्य आहे. तथापि एकंदर लेख पाहाता ७-८ वर्षाच्या कन्येचा विवाह गौण आहे व विवाहाचा प्रशस्त काळ दहावर्षापासून ऋतुप्राप्तीपर्यंतचा असून ऋतुप्राप्तीनंतर तीन वर्षेपर्यंत पुनः गौणकाल आहे इतकेच रावब. वैद्य यानी प्रतिपादन केले आहे असे दिसतें. मुलीस सामान्यत: १३-१४ व्या वर्षी ऋतुप्राप्ति होते असे मानलें तर मुलीचे ७ वर्षापर्यंत मुळींच लग्न करू नये; ७ वर्षानंतर १० वर्षापर्यंत लग्न करण्याचा काल गौण आहे, दहापासून तेरा चैौदापर्यंत प्रशस्त आहे व तेरा चैौदापासून सोळा सतरापर्यंत पुन: गौण आहे; असें या लेखांत दाखविलें आहे. यात व प्रस्तुत आचारात फरक इतकाच कीं, यापैकीं पहिला काल