पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० लो० टिळकांचे केसरीतील लेख लोकप्रशस्त समजतात, दुसरा गौण समजतात व तिसरा निषिद्ध मानतात. तथापि हल्लीं दुसरा काल प्रशस्त मानण्याकडे लोकांची उत्तरोत्तर जास्त जास्त प्रवृत्ति होत चालली आहे त्यामुळे मुख्य मुद्दा व मतभेद काय त्रे तिसच्या कालासंबंधानें म्हणजे ऋतुकालानंतर विवाह करावा किंवा नाहीं, यासंबंधानेच आहे असे म्हटलें असतां चालेल. या प्रकरणीं “ त्रीणि वर्षाण्युदीक्षेत कुमायूंतुमतीसति । उध्र्वे तु कालाद्देतस्माद्विदेत सदृशं पति ॥ ” इत्यादि जीं वचनें रावबहादूर वैद्य यांनीं दाखविली आहेत त्याचा विचार करण्याजोगा आहे गुणवान् वर न मिळाल्यास ऋतुप्राप्तीनंतर तीन वर्षेपर्यंत पित्यानें वाट पहावी असें यावरून स्पष्ट होतें. मात्र ऋतुदर्शन निमित्त प्रायश्चित्त केलें पाहिजे. रा. ब. वैद्य यानीं इतर वचनाची व या वचनाची केलेली एकवाक्यताही विचार करण्यासारखी आहे, व त्यावरून ऋतुप्राप्तीनंतर काहीं कालपर्यंत कन्यादानाचा अधिकार पित्यास आहे असे निर्विवाद सिद्ध होते. कन्येस पितृगृही ऋतु प्राप्त झाला असता दोप सागितला आहे खरा; पण रावबहादूर वैद्य म्हणतात त्याप्रमाणे त्यात जातिभ्रंश उत्पन्न होत नसून शात्यादि कमांनीं ज्याप्रमाणें अशुभाचे निवारण करावयाचे तद्वतच येथेही प्रायश्चित्तानें ऋतुनिमित्त दोषाचे निरसन करावे असे सागितले आहे.

  • ' विवाद्दोष्ठमवर्षायाः कन्यायास्तु प्रशस्यते ।। * ‘‘ सप्तमाद्वत्सरादूर्ध्व विवाह्ः सार्ववर्णिकः ?'

इत्यादि वचनांची एकवाक्यता करतांना मन्वादिस्मृतिकारानीं अद्यपि आठ वर्षा च्या मुलीचा विवाह सागितला आहे तथापि. ** त्र्यष्टवर्षोंष्टवर्षा वा धर्म सीदति सत्वरः” या मनुवचनातील ‘सत्वर’ पदावरून तो प्रशस्त मानण्यापेक्षा गौण मानणे बरें असें रा. ब. वैद्य याचे मत आहे, व त्याप्रमाणे त्यानी * विवाहेोष्टमवर्षाया:’ इत्यादि वचनात दोन वाक्यें कल्पून * विवाहोष्टमवर्षायाः । म्हणजे आठ वर्षाच्या मुलीचा विवाह होतेो; परंतु * कन्यायास्तु प्रशस्यते ? म्हणजे कन्येचा ( अर्थात् १० वर्षाच्या मुलीचा ) विवाह प्रशस्त आहे असा अर्थ केला आहे हा अर्थ एकवाक्यता करण्यास उपयेोगी आहे व तो लावण्यात रा. ब. वैद्य यानीं बरच चातुर्य दाखविलें आहे, तथापि त्यात लोकाची थोडीबहुत ओढाताण करावी लागते. * अष्टम वर्षायाः कन्यायाः ’ हा प्रयोग असंबद्ध आहे असे रा. ब. वैद्य यांचे म्हणणे आहे.पण कन्या शब्द पारिभाषिक घेतला तरच ही अडचण उपस्थित होते. या लोकापूर्वीच्या लोकात “ तस्माद्विवाहमत् कन्यां यावर्तुर्तुमती भवत् ” येथे कन्या शब्द पारिभाषिकच आहे असे म्हणण्याचे काही कारण दिसत नाही; व पुढील लोकातही तोच न्याय लागू केला असता रा. ब. वैद्य यानी दाखविलेली असबद्धता उत्पन्न होत नाही. यद्यपि रा. ब. वैद्य याचा या लोकाचा अर्थ आपण मान्य केला नाही तरी त्यांत विशेषशी हानि होते असें नाहीं. आमच्यामते ऋतुप्राप्तिनंतर तीन वर्षे विवाहकाल शास्रसंमत आहे हा मुद्दा विशेष महत्त्वाचा आहे. आठ वर्षांचा काल प्रशस्त असेल वा नसेल