पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ लो० टिळकांचे केसरींतील लेख अबलोन्नति लेखमाला-लेख ४ था * आज केसरीबरोबर अबलोन्नति लेखमालेचा जेो लेख वाटण्यात येत आहे हाच रावब. चिंतामणराव वैद्य यानीं हेमंतोत्सव व्याख्यानमालेत वाचून दाखविला होता. रावध. वैद्य यांनी अबलोन्नति लेख मालेचे आजपर्यंत जे अॅक प्रसिद्ध केल आहेत त्यावरून त्याचे लेख आस्थापूर्वक व मननपूर्वक लिहिलेले असतात हें वाचकास ठाऊक झालेंच असेल. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना' या न्यायानें रावब. वैद्य याचा व इतराचा मतभेद कोठे केोठे असू शकेल. तथापि मतवैचित्र्य क्षणभर बाजूस ठेवून जर कोणी सदर लेखमालेचे अवलोकन करील तर रावब. वैद्य यांच्या व्यापक बुद्धिचे, दीर्घपरिश्रमाचे व अवलोकनाचे त्यास आश्चर्य वाटल्यावाचून रहाणार नाहीं. प्रस्तुतचा अॅक इतर अकाच्याच धर्तीवर लिहिला असून दिवाणबहादुरादि सुधारणाप्रिय लेखकानी ज्या प्रमाणें शास्राची वाताहत करून सोडली आहे तसा साहसी प्रकार रावब. वैद्य यांनी केला नाहीं असे वाचकास आढळून येईल. प्रोफे. जिनसीवाले यानीं रावब. वैद्य याचे व्याख्यान वाचून झाल्यानंतर जी खरमरीत टीका केली होती ती अद्यापि बरीच दिवाणबहादुरादि लोकास अनुलक्षून होती. तथापि त्यातील बराच भाग रावब. वैद्यांच्या लेखास उत्तरा दाखल असावा अशी गैरसमजूत झाली असल्याचे दिसते; करता त्या संबधानें आमचे मत येथे स्पष्ट दाखल करतो. प्रो. जिनसीवाल यानीं दिवाणबहादुरादिकाच्या ग्रंथातून ज्या चुका झाल्याचे सांगितले तसा प्रकार हल्लींच्या निबंधात केल्याचे आम्हास आढळून येत नाही. एक दोन ठिकाणीं मतभेदास जागा आहे. तथापि नुसता मतभेद आहे म्हणून रावब. वैद्य याजवर वचनाचा खेोटा अर्थ केल्याचा आरोप ठेवता येणार नाहीं. मुद्दाम आडरानात शिरून वचनाची अॅाढाताण, अर्थविपर्यास अगर किबहुना अनर्थ करणे हा एक पक्ष आहे, व त्या पक्षांत कांहीं जाणती माणसेही शिरली आहेत हें सामाजिक सुधारणेंसंबंधान शास्त्रीय लेख ज्यांनीं वाचले असतील त्यास निराळे सागावयास नकेोच. रा. ब. वैद्य हे त्या पक्षांतील नसून पूर्वीच्या रीतीस अनुसरूनच त्यांनी निरनिराळ्या वचनाचे अर्थ लावले आहेत. सर्व वचनै एकत्र गोळा करून व त्याचे यथार्थ विवेचन करून त्याची एकवाक्यता करणे ही आमची जुनी शास्रार्थाची पद्धत आहे, व तीच रावब. वैद्य यानी आपल्या लेखात उचलली आहे. निरनिराळ्या ऋषींचीं वचन व ग्रंथकारांचे अभिप्राय हल्लींच्या लेखात अशा रीतीनें केल्यामुळे शास्त्रेाक्त विवाहकालावर हा स्वतंत्रच ग्रंथ आहे असे म्हणण्यास हरकत नाही, बालविवाह जर आपणांस संमत नाहीं तर असल्या शास्त्रार्थात पडून विनाकारण काथ्याकूट तरी करण्याची काय जरूर आह अशा आशयाचे काँहीं प्रश्न [ केसरी-तारीख २२ मार्च १८९२ ]