पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अबलोन्नति लेखमाला, ११७ कारण झाली असेल पण त्यांत बालविवाहाचा तरी समावेश होत नव्हता, नेपोलियननें इटली पादाक्रांत केली. तेव्हा त्या देशांतील लोक शूर होते परंतु त्यांत एकी नव्हती असें खुद्द नेपोलियन यानेंच लिहिले आहे. सारांश, जेथ जेथे एका राष्ट्रानें दुस-या राष्ट्राची पायमल्ली केली आहे, तेथे तेथे त्यास बालविवाह कारण झाला होता असें इतिहासावरून दिसून येत नाहीं. मग असा विलक्षण नियम हिंदुस्थानासच कां लागू करावा हें आम्हास समजत नाहीं. आमच्या दयाळू सरकारच्या सैन्यांतही गुरख, रोहिले, पुरभये, शीख वगैरे लोकांच्या पलटणी शैौर्यानें व हिमतीनें दुस-या केोणत्याही राष्टातील शिपायांची बरोबरी करूं शकतील परंतु स्वतंत्र राष्ट्रांमध्ये सेनानायक उत्पन्न होण्याची जीं साधनें असतात तीं सर्व आमच्या राज्यकत्यांनी आपल्या हाती घेतल्यामुळे गेोया शिपायास भात व काळ्या शिपायास पेज देऊन त्यातच आम्ही मोठे भूषण मानू लागलें आहो. रा. ब. चिंतामणराव वैद्य यास ही गोष्ट अवगत नाहीं असें नाहीं. आपल्या पुस्तकाच्या १२ व १३ कलमांत त्यांनीं या गोष्टींचा थोडासा विचार केला आहे. परंतु त्यांचा प्रकृत विषय बालविवाह असल्यामुळे सदर देवतेचे स्तोत्न त्यांनीं विशेष गाइले आहे ! लोकामध्यें जी हताशा उत्पन्न झाली आहे ती काढण्यास बालविवाह बद केल्यानें फारशी मदत होईल असें नाहीं. खाण्यापिण्याची सुबत्ता, शस्ने वापरण्याचा अभ्यास असल्यामुळे व्यायाम करण्याची हौस, स्वतंत्रता व जबाबदारीची कामें प्रसंग येत असल्यामुळे त्यापासून साहजिक उत्पन्न होणारा उत्साह, अभिमान व धैर्य ही सर्व राष्ट्रामध्ये येण्यास प्रौढविवाहाखेरीज दुस-या पुष्कळ गोÉा झाल्या पाहिजेत. तेजसान्न हिं वयः समीक्षते अशी संस्कृतात म्हण आहे. अग्नीच्या एका ठिणगीत जितके तेज असतें तितके हत्तीयेवढया शीलेतही असत नाही, हें आपणास नेहमीं लक्षांत बाळगावयास पाहिजे. आम्ही ज्या ज्या कांहीं सुधारणा करीत आहाँ त्या सर्व ऐरिशलोकात जारीर्ने सुरू आहेत, परतु तेजाची ज्येोती मालवल्यावर नुसत्या मरतमढयानें काय होणार ? बालविवाह बद होतील तर चागले, ते बंद होण्याकरिता प्रयत्न केले पाहिजेत व कालेकरून ते बंदही हेोतील, या गोष्टी आम्हास मान्य आहेत परंतु केवळ या एकाच गोष्टीकडे लक्ष न देता दुस-या अधिक महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणण्यांत या बरोबरच आपणास प्रयत्न केला पाहिजे. रावब. वैद्य यानी ह्या दुस-या मुद्याकडे प्रकृत निबंधात फारसें लक्ष दिले नाहीं त्यामुळे हल्लीचा लेख जरा एकतर्फी झाला आहे. तथापि एकंदरीत पूर्वीच्या लेखाप्रमाणेच हाही विचारपूर्वक माहिती मिळवून लिहिला असल्याकारणानें तो सर्वत्रास उपयुक्त होईल यांत शंका नाही.