पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ लो० टिळकांचे केसरींतील लेख अबलोन्नति लेखमाला. ५ लेख तिसरा. रा. ब. चिंतामणराव वैद्य यानी अबलोन्नति लेखमाला सुरूं करून त्यातील तीन लेखांचा परिमल आपल्या खर्चानें लोकात प्रसृत केला याबद्दल त्याचे आभार मानून त्यांच्या उद्येोगाची तारीफ करणे हे आजचे पहिले काम आहे. गुदस्ता या लेखमालेस जेव्हा पहिल्याने सुरवात झाली तेव्हा या मालेचे उद्देश व त्यापासून होणारे फायदे याचे आम्हीं दिग्दर्शन केलच आहे. अशा रीतीनें शातपणाने व मुद्देसूद लिहिलेले लेख महाराष्ट्रात क्वचितच सांपडतात. त्यातून सामाजिक विपयासबधाने तर अलीकडे शातपणाचा सर्वानी निरोपच घेतल्यासारखा आहे ! अशा स्थितीत अबलोन्नति लेखमालेतील तिसरे पुष्प चितामणरावानीं आम्हांस सादर केलें याबद्दल त्याचे आभार मानून या पुष्पाच्या सौंदर्यात व परिमलात सत्यासत्यतेचा कितपत भाग आहे याचे परीक्षण करू. मागील लेखाप्रमाणे हाही लेख, विचाराने, पोक्तपणाने व दोन्ही पक्षातील साधकबाधक प्रमाणे लक्षात आणून लिहिला आहे हे पुनः पुनः सागण्याची जरूर नाही, करिता लेखातील इतर माहितीकडे वळू बालविवाहापासून होणारे दुष्परिणाम राव. ब. वैद्य यानी सुरेख वर्णन केले आहे. वाढ परिपूर्ण होण्यापूर्वी वधुवरास मातापितृत्व प्राप्त व्हावें व त्याचे परिणाम पिढीनपिढी सुरू रहावेत ही गोष्ट केोणत्याही राष्ट्रास हितकारक व्हावयाची नाही. त्यातून हल्लीच्या आमच्या पराधीनावस्थेत बालविवाहापासून होणारे परिणाम अधिकच बळावत जात आहेत आणि ज्याप्रमाणे एखादा मोठा वृक्ष नाश पावून त्याच्या जागी लहान लहान रोपें स्वतंत्र रीतीने रुजावीं त्याप्रमाणे मोठमोठी कुटुबें मोडून जाऊन हल्लीच्या कालात त्याच्या जागीं नवराबायकोचीं छोटेखानी विठोबारखमाईची कुटुंबे वाढत चालली आहेत असे दिसून येतें. निदान वरिष्ठ प्रतीच्या लोकात तरी हा प्रकार जारीने सुरू आहे असे म्हणण्यास काहीं हरकत नाहीं. इंग्रजी शिक्षणानें मुले चावट झाली अगर स्वतंत्रता जास्त प्रिय वाटू लागली अथवा अन्नाकरिता दाही दिशा भटकाव्या लागल्या यांतून कोणतेही जरी कारण स्वीकारले तरी त्याने वस्तुस्थिति पालटत नाहीं. पूर्वीच्या कुटुंबव्यवस्थेतील नियम शिथिल होऊं लागले आणि नवीन बंधनें अद्याप अमलांत आली नाहीत, अशा काळीं कोणच्याही व्यवस्थेतील गुणापेक्षा दुर्गुणांचेच जास्त प्राबल्य दिसावयाचे व त्याप्रमाणे ते दिसतही आहे. निराशा, नाउमेद, निर्बलता आणि निरुत्साह यानी आपणास तूर्त ग्रासून टाकिलें हें निःसंशय आहे. ही स्थिति बालविवाहाचा परिणाम आहे असे चिंतामणरावांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे,

  • ( केसरी-तारीख २६ जानेवारी १८९२.)