पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नागपूर येथील सामाजिक परिषद. ११३ अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे व आमच्याकडेही शतमुखानीं सागरास मिळणाच्या गंगेचे मूळ हिमालयाच्या दरींतून कष्टार्न दृग्गेोचर होतें अशी यथार्थ समजूत आहे. या न्यायार्ने आज जरी सामाजिक सभेस ५-२५ सांपेक्षां जास्त मुखत्यार न आले तरी काहीं हरकत नाहीं. एकट्या बुद्धीनें नवीन धर्म प्रचारात आणला व एकटया शंकराचार्यानींच वैदिक धमीची पुन: स्थापना केली ! एकेकटया गृहस्थाच्या हातून जर एवढी कामें होतात तर ५-२५ सुधारणाभक्त काय न करूं शकतील ? निश्चयाने सर्व गोष्टी सिद्ध होतात, करतां निश्चयी पुरुषांपुरतीच सामाजिक परिषदेची व्याप्ति ठरवून व त्या मंडळाचे अग्रेसरत्व पत्करून रावबहादूर यंदा सुरूं केलेल्या क्रमाप्रमाणे कोणाचेही मन न दुखविता जर सुधारणेचा झेंडा उभारतील तर त्या जरीपटक्याभोवती त्याचे अनुयायी बरेच गोळा होतील. बाजारबुणग्यांची तर सध्याच भरती आहे. तिकडे रिकूट मिळवावयास नकेात ! तुम्ही विलायतेस जावयाचे म्हणा, ही मंडळी दोन्हीकडूनही हात वर करण्यास तयार आहे ! कोणत्याही पक्षाचा पराजय होवो अगर सरशी होवेो; ज्यास फक्त लुटोचीच अपेक्षा त्यांस त्याचे काय होय ? असली मंडळी सैनिकांच्या पटावरून काढून टाकून त्याचीं नार्वे त्यास योग्य अशा स्थळीं म्हणजे पेंढाच्यांत घातली म्हणजे यंदा ज्थाप्रमाणें सभेचे सुकाणू आपल्या हातून निसटतें कीं काय अशी अध्यक्षांस एकदोनदा भीति पडली. तसा प्रकार पुनः घडून येणार नाही. करिता आमच्या सूचनचा सभेच चालक योग्य विचार करतील अशी आमची उमेद आहे. खेरीज हल्लींच्या स्थितीत दोन पक्षाच्या विरोधांत ज्या प्रतिसूचना सर्भेत येऊन पास होतात अगर बखेडा करतात तसा प्रकार मग मुळीच होणार नाही. सामाजिक बाबतींत कायदा नको. हें तत्त्व परिषदेस कबूल आहे ? आता चुकूनमाकून एखाद्या ठरावाच्या मसुद्यांत अमुक गोष्ट कायद्याने बंद करावी असे येते ते प्रायः पूर्व संचिताचे फळ असावें. ही खोड जाण्यास कांहीं अवधी लागेल, परतु ती जाण्याच्या पंथात आहे एवढी समाधानकारक गोष्ट नागपूरच्या परिषदेपासून आम्ही घेण्याजोगी आहे. सभेची इल्लींची व्यवस्था कायम राहिल्यास अध्यक्षास मुलाचे बारावें वर्षीं लग्न करण्यास अगर हवा तितका हुंडा घेण्यास अगर पुनर्विवाहांत कन्यादान करून पंक्तिप्रसादाची चुकवाचुकवी करण्यास फारशी अडचण येत नाही ही गोष्ट खरी आहे; तथापि परिषदेचे हेतू तडीस जाण्यास योडासा प्रत्यवाय येतो तो काढून टाकला आणि खरोखरच निस्सीम सुधारणा भक्ताचीच परिषद केली तर हें सुधारऐाचे काम काणाचीही अप्रीति संपादिल्याखेरीज अगर बखेडा माजावल्याखेरीज गुण्यागोविंदाने पार पडणार आहे. नागपूरच्या परिपदेत झालेल्या वादविवादाचा जर असा परिणाम झाला तर त्यात सर्वाचेच इष्ट हेतु सिद्धीस गेले असे म्हटले पाहिजे. १४ sassassassassmarams=