पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अबलोन्नतेि लेखमाला, ११५ किंबहुना प्रस्तुत लेखाचा बराचसा भाग या मुद्दयाच्या विचारासच वाहिला आहे असे म्हटले तरी चालेल. आमच्यामतें हा अतिशयोक्तीचा भाग आहे, करतां येथ आज त्याचा थोडा जास्त विचार करावयाचे योजले आहे. बालविवाहापासून दुष्परिणाम होत नाहीत असे आमचे म्हणणें नाहीं. तथापि सर्व राष्ट्रीय उहासाचे बीज बालविवाहातच आहे हें म्हणणें ब-याच धाडसाचे होईल असें आम्हास वाटतें, हिंदुस्थानचा इतिहास ज्यानें लक्षपूर्वक पाहिला असेल त्यास सकृत्दर्शनींच राव. ब. वैद्य याचे सिद्धात चमत्कारिक भासतील. बालविवाह हा हिंदुराष्ट्राच्या व्हासाचे बीज आहे अशी पहिल्यानें मनाची खात्री करूनच त्यांनी हिंदुस्थानच्या इतिहासाचे प्रकृत निबंध लिहिताना पर्यायलोचन केलें असावें असे दिसते. हिंदुस्थानाच्या उहासाचा काळ म्हटला म्हणजे मुसलमानी अमलास जेव्हापासून सुरवात झाली तेव्हापासूनचा होय. बालविवाह हा उहासाचे कारण असल्यास तो अर्थातच त्या कालापूर्वी दोनतीनशें वर्षे अमलांत असला पाहिजे. म्हणजे सुमारें सातव्या शतकात बालविवाह सुरू झाला असावा असें वरील कोटिक्रम स्वीकारणारास वाटेल. सातव्या आठव्या शतकातील मोठी उलाढाल म्हटली म्हणजे बुद्ध धर्माचा उहास व ब्राह्मणधर्माची संस्थापना ही होय. अर्थात् शंकराचार्यानी बालविवाह अमलात आणला असावा या विचारसरणीनें निष्पन्न होतें. हुएनसाग नावाचा चिनी प्रवासी सातव्या शतकात इकडे येऊन गेला; त्यानें हिंदुलोकात आलेला असंमतवैधव्याचा प्रकार आपल्या ग्रंथांत सागितला आहे. परंतु बालविवाह सागितला नाहीं. हुएनसागचा हा लेख आणि पूर्वोक्त विचारसरणीनें निघालेलें अनुमान या दोहोची सांगड घालून त्यावर चितामणराव वैद्य यांनी आपली बहुतेक इमारत रचली आहे; परंतु ही सागड कितपत यथार्थ आहे याचा पहिल्याने विचार केला पाहिजे. हुएनसागने अमूक एक गोष्ट सागितली नाही म्हणून ती त्या वेळेस प्रचारात नव्हती हें म्हणणे बरोबर नाही. हुएनसागच्यापूर्वी होऊन गेलेले आमच्यामधील पुष्कळ ग्रंथकार आहेत. मुख्य मुख्य स्मृति आणि सूत्रे हुएनसांगच्या वेळीं प्रचारांत असून पूज्य मानीत असत. या ग्रंथांतून मुलीच्या लग्नाचा काल आठवर्षापासून ऋतुप्रासीपर्यंत सागितला आहे. स्मृति व सूत्रकार यांनीं प्रचारात असलेल्या चालींचाच उल्लेख केलेला असावा व तो उल्लेख खरा मानला म्हणजे अर्थातच बालविवाहाची पद्धत फार जुनी आहे असे म्हणावे लागते. हेमंतोत्सव व्याख्यानाच्या वेळीं ज्या स्मृतिग्रंथांतील प्रमाणे चिंतामणराव वैद्य यांनीं वाचून दाखविली त्यावरून आम्ही म्हणतों हें सिद्ध होईल. ‘नग्निकातु प्रशस्य ते गौरीं ददन्नाक पृष्टम् ? इत्यादि वचनें हुएनसागच्या अबोल्याविरुद्ध साक्ष देतात. कुमारपाल राजाच्या दरबारांत जेो वाद झाला तो दोन जैनपंथांमध्ये झाला. त्याचा स्त्रियाच्या सामाजिक स्थितीशीं कांहीं संबंध होता असें दिसत नाहीं. सारांश गोभिलसूत्र, मनुस्मृति, पराशर,