पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० लो० टिळकांचे केसरींतील लेख दोन्ही अडचणी लक्षांत आणून सुधारणेचा उद्योग चालविला पाहिजे, तसा उद्योग आजपर्यंत झाला नाहीं हें रा वैद्य यांनीं सुधारणेच्या खटपटीचा जेो इतिहास दिला आहे त्यावरून स्पष्ट होते. सुधारलेल्या राष्ट्रांतून अशी रीत आहे कीं जव्हां एखादी गोष्ट अमलात आणणें इष्ट आहे असे काहीं लोकांस वाटतें तेव्हा लागलीच ते लोक एखादी लहानशी मंडळी स्थापन करितात व जिवापाड श्रम करून स्वार्थाकडे नजर न देता एकसारखी लोकमत आपल्या बाजूचे करण्याची खटपट सुरू करितात. आमच्या देशापेक्षा विलायतेत वर्तमानपत्रांचा फैलाव जास्त असून त्यांचे वजनही अतिशय आहे. तथापि या उद्योगी मंडळीस फक्त वर्तमानपत्राचेच साहाय्य पुरेसे वाटत नाही. कोणी आपला सर्व धदा सोडून लोकास व्याख्याने देत हिंडतात, कोणी स्वतंत्र पुस्तकें अगर पत्रकें काढून त्याच्या लाखी प्रती लोकास फुकट वाटतात, कोणी जागोजाग आपल्या मताच्या प्रसारार्थ मंडळ्या व उपमंडळ्या स्थापन करितात आणि कोणी आपल्या मताच्या मंडनार्थ नाटकें लिहून त्यांचा प्रयोग करितात. हे सर्व उपाय अमलांत आणण्यास द्रव्याची किती जरूर आहे हें सांगावयास नकोच. आमच्यात अशी म्हण आहे कीं, सर्व सोंगें येतात पण पैशाचे सोग येत नाहीं, परंतु पाश्चिमात्य देशातील लोकांची कार्य करण्याची हातोटी कांहीं विलक्षण आहे. एकदा एखादी गोष्ट करावयाची असे त्यांनी मनांत आणलें म्हणजे मग त्या मताचे लोक आपलें सर्वस्व त्या कामीं खर्चण्यास तयार असतात. त्यातील असें कोणी म्हणत नाही कीं, “ पुनर्विवाह करावा असें आमचे पूर्ण मत आहे व केोणी असा विवाह केल्यास आमचा त्याच्या घरी जेवावयास किवा पानसुपारीस जाण्याचा सक्त निश्वय आहे, बाकी आम्हास पुनर्विवाह करावयास किंवा पुनर्विवाहापासून झालेल्या संततीशीं शरीरसबंध करावयास सागाल तर तेवढी गोष्ट मात्र आमच्या वृद्ध मातेाश्रींच्या भिडखातर आम्हास करितां येत नाहीं. ” पंडिता रमाबाईस हिंदू विधवाची स्थिति सुधारण्याकरिता जी मदत मिळाली आहे ती देखील याच लोकाकडून ! ताप्तर्य, हाती घेतलेलें काम कसें तडीस न्यावें याचा कित्ताही पाश्चात्य लोकांकडूनच आपण उचलला पाहिजे, व तेो जोपर्यंत आपण उचलला नाही तोपर्यंत सुधारणेची आमची बडबड व्यर्थ आहे; आम्हांस पैशाचा इतका लोभ आहे की लाखो रुपये जवळ झाले तरी तृपि होत नाहीं, कृति पाहावी तर ( चेोरून मारून केलल्या गोष्टी सोडून द्या) घरात विचारल्याखेरीज एकही पाऊल पुढे पडत नाहीं, आणि हिमतीच्या व धैर्याच्या नावानें आंवळ्या येवढे पूज्य ! एक मात्र गुण पूर्णपणे आमच्यात दृष्टीस येतो. आमचे विचार खुद्द मिल्ल व स्पेन्सर याच्याही पुढे धांव घेत असतात, आणि “ वाचि वीर्य द्विजानाम् ” या न्यायानें आमची ओरड मात्र खूप चालली असते. अशा त-हेच्या सुधारकास रा. वैद्य यांची मर्ते अर्थातच रुचणार नाहीत हे आम्ही जाणतों, परंतु ज्या अर्थी रा. वैद्यांप्रमाणें