पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणा कशानें होईल. १०९ केलेले मतही गुंडाळून ठेवून रूढीस शरण जाण्याचा प्रसंग येतो. तशी वेळ शेटजींवर कधींच गुदरत नाही, ह्यावरून त्याचे धैर्यं अधिक असते असे मात्र केोणी समजूं नये. ते परजातीय असल्यामुळे हा त्यांस फायदा मिळती परंतु त्या फायद्याबरोबरच बोलल्याप्रमाणे आचरण करणाराचे विचार जितके लोकांस ग्राह्य होतील तितके परजातीयाचे विचार लोकांस ग्राह्य होत नाहीत. किलेयकांस तर त्याची चीड येते व कित्येक त्यांचा उपहास करितात. तात्पर्य, कोणत्याही ज्ञातीची सुधारणा करणें झाल्यास त्या ज्ञातीखेरीज बाहेरच्या लोकांनी त्यात पडून फारसा उपयोग होत नाहीं. डॉक्टर हंटर यांनी हिंदू विवाहपद्धतीवर विलायतच्या टाइम्सपत्रात जे तीन मार्मिक लेख प्रसिद्ध केले आहेत, त्यातील सिद्धांतही अखेरीस आम्हीं वर लिहिल्याप्रमाणेच आला आहे. मलबारी शेटजींनीं प्रौढवयात लमें बंद करण्याच्या वगैरे ज्या कांही अनुचित सूचना केल्या होत्या त्यांजवर हटरसाहेबांनीं खरपूस टीका केली आहे, परंतु सामाजिक सुधारणा कोणत्या रीतीनें करावी हें सांगण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा शिक्षणाच्या प्रसाराखेरीज हंटरसाहेबास दुसरी चांगली युक्ति सुचवितां आली नाही. यावरून परकीयाच्या हातून या विषयाची तड लागणे किती कठीण आहे हें वाचकाच्या लक्षात येईलच. त्यांच्यापैकीं साहसी असतात ते ज्या सूचना करितात त्या आविचारीपणाच्या असतात, व जे विचारी असतात त्यांस परजातीयांच्या अाचारविचारात ढवळाढवळ करण्याचे साहस होत नाहीं. मध्यमप्रतीच्या लोकाचीं मने आपआपल्या धर्मीच्या व रीतीभातींच्या अभिमानानें ग्रस्त झाल्यामुळे त्यांचाही या कामीं फारसा उपयोग होत नाही व झाला तरी तो केवळ परोपकारबुद्धीनेंच होत असेल, व त्यात काही परधर्मीचा संबंध नसेल अशी लोकाची पुरी खात्री होत नाहीं. तेव्हां ही दिशा आपणांस अजीबात सोडून द्यावी लागते. सारांश आपल्या व्यवहाराची व सामाजिक रीतीभातींची सुधारणा, करणें असल्यास ती आपली आपणांसच केली पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे, व तसे करण्यासही मुख्य साधन म्हटलें म्हणजे राजश्री वैद्य म्हणतात त्याप्रमाणें स्रिया व मध्यमप्रतीचे लोक याच्यांत या गोष्टीची विशेष चळवळ सुरू केली पाहिजे, हें होय. परकीय सरकार केवळ दहापांच लोकांच्या म्हणण्यावरूनच हिंदूलेोकाच्या रीतीभातींत कोणताही महत्त्वाचा फरक कायद्यार्ने करण्यास धजणार नाहीं हें अगदीं उघड आहे तेव्हा कायदा कायदा म्हणून ज्यांनी ओरड मांडली आहे त्यांनीही लोकमत आपल्या बाजूचे करण्याची खटपट केली पाहिजे. बहुमत आपल्या बाजूचे झाल्याखेरीज हल्लीच्या काळात कोणास कोणत्याही प्रकरणीं यश येण्याची आशा राहेिली नाही. त्यातूनही सामाजिक प्रश्नासंबंधीं आणखीं असा विशेष प्रश्न आहे की, अमुक अमुक गोष्ट करा असें लोकांस सांगणाच्या मंडळीच्या उपदेशात व आचरणांत कांहीं तरी मेळ असावा लागतो, नाहींपेक्षां इसाबनीतातील बेडूकवैद्याचा ज्याप्रमाणें उपहास झाला त्याच उपहासास हे उपदेशक पात्र होतात. ह्या