पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नागपूर येथील सामाजिक परिषद. १११ आम्हांस या कामी दुसरा कांहीं इलाज दिसत नाहीं त्या अर्थी कोणाच्या खुषीनाखुषीकडे न पाहतां खरा प्रकार लोकांपुढे मांडला पाहिजे. रा. वैद्य यांनीं स्त्रिया व मध्यम प्रतचेि लोक सुधारणेस अनुकूल करून घेतले पाहिजेत असें म्हटले आहे तें अगदीं यथार्थ आहे. पण ती गोष्ट सिद्धीस नेण्यास फक्त चागलीं पुस्तकें वांटूनच पुरै होणार नाहीं. रा. वैद्य यांनी आपला वेळ, बुद्धि व पैसा खर्च करून आपल्या हातून होणारी गोष्ट करण्याचे पत्करले आहे, हे ठीकच आहे; परंतु ज्यास त्याच्याप्रमाणें सुधारणा होणे इष्ट वाटत आहे त्यांनी एखादा मंडळी स्थापन करून मिशनरी लोकाप्रमाणे या कार्मों लेखन, वाचन व उदाहरण या तिन्ही रीतीनीं यथाशक्ती कां मदत करूं नये. हें आम्हास समजत नाहीं. पुस्तकापेक्षाही कीर्तन किंवा व्याख्यानांपासून जास्त उपयोग होती ही गोष्ट सर्वास ठाऊ. कच आहे. त्याचप्रमाणे जागेोजाग एकाच कामाकरिता मंडळ्या स्थापन करण्यापासूनही किती उपयेोग होतो हें कॉंग्रेसच्या उदाहरणावरून लोकांच्या लक्षांत आलेच आहे. मग सामाजिक सुधारणेच्या कामीं या साधनांचा आपण कां उपयोग करू नये हें आम्हास समजत नाही. लोकमत राजकीय विषयात व इतर बाबतींत आमच्या तर्फेनें असणे जरूर आहे. मग सामाजिक बाबतीतच आम्ही त्यास सोडून कोठे जाणार ? करिता २५॥३० वर्षात कोणत्या गोष्टी घडून येणे शक्य आहेत याचा नीट विचार करून त्याप्रमाणें लेखन-वाचन-उदाहरण-द्वारा लोकमत आपल्या बाजूचे करण्यास प्रथमत: उद्योगास लागार्वे अशी सर्व सुधारणेच्छू जनास आमची प्रार्थना आहे. intetingsflätastigmaanser नागपूर येथील सामाजिक परिषद* या परिषदेची साग्र हकीकत दुसरीकडे दिलीच आहे, यास्तव येथील कांहीं पत्रातून जो मजकूर प्रसिद्ध झाला आहे त्यातील खेडिसाळपणा वाचकाच्या लक्षांत येईलच. सामाजिक सभेचे काम यंदा चांगल्या रितीने पार पडलें याबद्दल आमच्या कित्येक बंधूंनी आपला आनंद प्रदर्शित केला आहे. त्या त्याच्या आनंदांत आम्ही किमपीही अंतर पाडू इच्छित नाहीं. प्रत्येक व्यक्तिमात्रास अर्थात् जनसमूहास आपली मतें व्यक्त करण्यास किंवा त्याप्रमाणे आचरण ठेवण्यास पूर्ण अधिकार आहे, परंतु हा अधिकार चालवीत असता जेव्हा लोकाच्या अधिकारावर अतिक्रम होते तेव्हां वादास सुरुवात होते. सामाजिक सभेनें राष्ट्रीयरूप धारण कर ण्याचा प्रयत्न न करिता राव. ब. रानडे यानीं कबूल केल्याप्रमाणें सुधारणाभक्तमंडळीचेच रूप आजपर्यंत धारण केले असतें तर यंदा नागपुरास जो बखेडा झाला तोही झाला नसता.

  • (केसरी ता. १२ जानेवारी १८९२, )