पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० ४ लो० टिळकांचे केसरींतील लेख चुकीचा असून सामाजिक परिषदेचा रिपोर्ट खेोटा आहे असें टिळक यांनीं सांगितलें. नंतर अध्यक्षाचे सुमारें तासभर भाषण झाले की कोणताही विचार नवा नाहीं, जुन्या काळांत त्याविषयी काहीतरी चर्चा झालेली असतेच.सव्वीस वर्षामार्गे ह्याच प्रकारच्या सूचना आल्या होत्या,परंतु आजच्या सभेचा एकंदर बेत काय आहे हें आधी आपण ठरविलें पाहिजे. मला आजचा बेत समजला नाहीं, सबब व्याख्यात्याच्या नात्यानें या विषयास धरून मी आपले मुख्य आक्षेपरूप विचार कळवितो. त्यात त्यांनी मुख्य मुद्दा असा दाखविला की ह्या वयाच्या इयतेसंबंधी कायदा मागण्याची जी खटपट सुरू आहे ती मुळीच चुकीची नाही असे मी सिद्ध करूं शकतीं. ब्रहोमध्यें अथवा नेटिव क्रिश्चियनमध्यें १४ किंवा १३ वर्षाची जी इयत्ता ही धर्मसंबंधाची नव्हे, तर केवळ शारीरिक विचाराची आहे, व त्यातच विचारास अनुसरून सरकारने संभेगसंमतीची इयत्ता १० पासून १२ पर्यंत वाढविली असता तुमच्या धर्माच्या भानगडीमध्ये सरकार पडत नाही हे उघड आहे. आता माझे मत आपल्या समाजव्यवस्थेच्या भानगडीत सरकाराचा हात पडावा असें मुळीच नाहीं; तथापि सरकारच्या कायद्यात जर एखादी चूक असली तर ती दुरुस्त करण्याबद्दल खटपट करावी असा जर ह्या सूचनेसंबंधानें आक्षेप घेतला तर ते असंबद्ध दिसणार नाही. यावर त्यानी फार विचाराचे व पोक्तपणाचे भाषण केले. त्यांतील मुद्दे फार लक्षात ठेवण्यासारखे आहेत, परंतु ते रा. टिळकाच्या सूचनांबद्दल केले नसल्यामुळे आम्ही आज येथे नमूद करीत नाही. SAASAASAASAASAASAASAAAS सामाजिक सुधारणा, ¥ अबलोन्नति लेखमाला, फुकट घ्या, वाचा आणि मनन करा ! आजच्या केसरीबरोबर सुमारे सवाशं दीडश पानाचे बारीक टैपांत छापलेलें जें पुस्तक जास्त टपालहंशील भरून् फुकट वाटले आहे त्याचे श्रेय सर्वाशीं आमचे मित्र रावसाहेब चिंतामणराव वैद्य एम्. ए. एल, एल, बी., शिंदे सरकारच्या राज्यांतील उजनी येथील डिस्ट्रिक्ट जज यांजकडे आहे हें प्रथमतः आम्ही मेोठ्या संतोषाने व उत्साहानें वाचकास कळविती. रा. वैद्य याचा विद्याभ्यास मुंबई येथील एल्फन्स्टन कालेजात झाला असून तेथे त्यांनी बरेच दिवस फेलोशिपचेही काम केले होतें, व तेव्हापासून याच्या सहाध्यायी मडळीत व कॉलेजात ह्यानीं कोणताही विषय हातीं घेतला असता तो ते मोठ्या काळजीनें व शांतपणाने विचार करून तयार करितात अशी ह्याची ख्याति आहे. त्याचप्रमाणें

  • (तारीख ४ नोव्हेंबर १८९०)