पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक सुधारणा ૦ખ रा. वैद्य हे आजपर्यंत सुधारणेच्या कोणत्याही पंथांत पडले नसल्यामुळे त्यांच्या बुद्धींत कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश शिरला नाहीं. अशा त्रयस्थ व विचारी गृहस्थानें सुधारणेकरिता आजपर्यंत झालेल्या खटपटीबद्दल आपले काय म्हणणे आहे हें आपला अमूल्य वेळ विशेषतः पैसा खर्च करून आम्हास कळविलें याबद्दल आम्हीं त्यांचे अत्यंत आभार मानिले पाहिजेत. रा० वैद्य याचा व आमचा कांहीं बाबतींत मतभेद असेल, परंतु त्यामुळे सुधारणेचा आजपर्यंतचा इतिहास व ती सिद्धीस नेण्याचे योग्य उपाय याचे इतकें सुरेख विवेचन करून तें आपल्या खर्चानें लोकांपुढे माडणाच्या गृहस्थाबद्दल आमचा यत्किचित्ही गैरसमज होणार नाही इतकेंच नव्हे, तर त्याचे आम्ही नेहमीं अभिनंदनच करूं. आमच्यामतें तर सुधारणेच्या खटपटीस जें कांहीं नवीन वळण लागावयास पाहिजे होतें त्याचा रा० वैद्य यांनीं पायाच घालून दिला असे म्हटल्यास चालेल. रा. वैद्य यास या विषयावर जे लेख लिहावयाचे आहेत त्यापैकी हा पहिला लेख आहे हें त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठानरूनच वाचकांचे लक्षात येईल. रा. वैद्य यांचे असें मत आहे: सुधारणा होण्यास मुख्यत्र्वेकरून मध्यम व कनिष्ठ स्थितीच्या लोकांचीं मर्ते प्रथमत: पालटलीं पाहिजेत व आपल्या शक्त्यनुसार बालविवाह, असंमतवैधव्य वगैरे विषयांवर आजच्या सारखीं दहाबारा पुस्तके फुकट वांटून या विषयाचे खरें स्वरूप लोकापुढे मांडावें असा त्याचा इरादा आहे; परंतु अशा त-हेर्ने प्रत्येक विषयावर स्वतंत्र लेख लिहिण्यापूर्वी साधारण सर्व विषयाचा प्रथमतः ऊहापोह करणे जरूर होतें व त्याचप्रमाणे आजपर्यंत सुधारणेच्या कामी जे प्रयत्न झाले त्यांचा वृत्तात व ते सफळ होण्याचीं कारणें ही थोडक्यांत दाखविणें अवश्य होतें. तेव्हा या दोनच गोष्टीचा आजच्या पुस्तकात विचार केला आहे. वर्तमानपत्रांतून व व्याख्यानद्वारा या विषयाची आज पंचवीस तीस वर्षे चर्चा चालली आहे खरी; पण सिंहावलोकन न्यायानें सुधारणेची इच्छा आमच्या अंत:करणांत जागृत होण्यास काय कारण झाले, बंगाल्यांत व मुंबईत तिची पहिली फले कोणत्या रूपानें प्रकट झाली, ईश्वरचंद्र विद्यासागर व विष्णुशास्री पंडित यानी या कामी काय खटपट केली, खुद्द श्रीमच्छंकराचार्याच्या समोर पुणे येथे जी मेोठी अपूर्व शास्रीपरिषद् जमली होती तिचा अखेर काय परिणाम झाला, व सरतेशेवटी “ पुराणांतील वागीं पुराणांत ” याप्रमाणे किंवा ** एखादें औषध किंवा वनस्पति नवीन असली म्हणजे तिचा प्रयोग एकदम मनुष्यावर केल्यास कदाचित् घात होईल म्हणून डॅॉक्टर लोक १३