पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुळशी बार्गेतील सभा १०३ तो आजकालचा नव्हे. रा० टिळकानीं ज्याप्रमाणे ४५ वर्षे या गोष्टीचा विचार केला आहे तसाच आज सहासात वर्षापूर्वी या गोष्टीचा मद्रासेकडे, गुजराथेमध्ये विचार झालेला आहे, व रा० टिळकानीं ज्या सूचना आणल्या आहेत त्याप्रमाणे काहीं अमलांत आणण्यासाठी मंडळी स्थापन होऊन सुधारणेस सुरुवात करून पुढे अनिश्चय उत्पन्न होऊन ती मंडळी विस्कळीत झाली. या प्रत्येक सूचनेसंबंधी विचार करणे हें नवीन नाही. आम्ही काही मंडळीच्या साहाय्यानें अशाच सह्या गोळा करण्याचा प्रयत्न आज एकसारखा दीड वर्ष चालविला आहे. त्यात जे आकडे मिळाले आहेत त्यावरून टिळकीच्या सूचना पसत पडणारे लोक फारच थोडे सापडतील असे आमचे अनुमान आहे. नतर बरेच आकडे सागून रावबहादुरानी आपले म्हणणे प्रतिपादित केलें, व रा० टिळकांनी जी सुधारणेची पायरी धरली आहे ही आम्हाविरुद्ध नाहीं इतकेच नव्हे तर ते आमच्याच पक्षाकडले आहेत असे आता आम्हास स्पष्ट समजले. अात टिळकाचे मत गेल्या वर्षी सामाजिक परिषदेत सागितलेल्या मनाहून निराळे झाले ही गोष्ट फार आनंदाची आहे; का की पूर्वी कायदा नको असे त्याचे म्हणणे असून हल्ली तें मत बदलले आहे. आता सूधारणेसबधी लोकस्थितीचा विचार केला म्हणजे चार पायच्या दृष्टीस पडतात. एक धर्मगुरूचे साहाय्य इच्छिणारे, दुसरी जातीच्या मेंडळीवर अवलबून बसून सूधारणेचा प्रयत्न करणारे, तिसरी अशद्वारें सर्वाची सुधारणा करण्यासाठी कंपनीचा कायदा आपणास लावून घेणारे व चवथी सर्वस्वी कायदा मागणारे. हे सर्व मार्ग वस्तुत: पहाता एकच आहेत. आता कोणी आमच्या मार्गात फार मागसलेले आहेत, कोणी त्याहून पुढे आलेले आहेत. तिसच्या पायरीस पोहोचलेला त्यास तर मी आपला सखाच समजतों, व चवथ्या पायरीस पोहोंचलेला मनुष्य व मी एक -अभिन्नच-आहो. नंतर टिळकाच्या सूचनातील आकड्याचा विचार करून त्यावर काही समविषय मतें देऊन एकदर सूचनाचे त्यानीं मनापासून अभिनदन केले. नतर रा. सा. नामजोशी यांनी थोडे परंतु फार सुरस व काहीसे सामान्य-लोकच्छंदानुवर्तनप्रतिपादक भाषण केले. नंतर रा० साने यानी एक आक्षेप काढून त्याविषयी उल्लेख केल्यावर अध्यक्षानीं सभेचे काम लाबले म्हणून बोलणाराची सख्या पाहिली. डॉक्टर भाडारकरानी एक प्रश्न असा घातला कीं, रा. ब. रानडे व रा. टिळक याचे ऐकमत्य आहे असा माझा समज झाला आहे, तर यात मतभेद आहे असे मानल्यास तो कोणता आहे व त्यावर उभयताकडन काहीतरी च चाँ होऊन त्याची एकवाक्यता होण्याचा सेभव आहे की नाहीं ? नतर रा. टिळक यानीं रा. बैं. रानडे यांच्या व आपल्या भतात भेद सागितला कीं, रा ब. चे म्हणणे केवळ रूढ होत असलेल्या आचारास बंधन घालण्यापुरतेच आहे व त्याने जरी थेोडाबहुत कार्यभाग झाला तथापि रूढीचे पाऊल पुढे पडण्यास त्यात काही तजवीज केलेली नाही व माझ्या सूचनेंत केलेली आहे. रा. ब. नीं मत बदलण्याचा आरोप आपणावर आणिला होता तोही