पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०२ लो० टिळकांचे केसरीतील लेख १६ वर्षाची यत्ता करण्यास काही बाध येत नाही. सर्वास आवडेल तर १५अगर १४ ची जरी इयत्ता झाली तरी माझी हरकत नाही. इतकेंच की, एकदा इयत्ता ठरल्यावर ती ठरावणाया मंडळीनें स्वत: ती अमलात आणण्याची सुरवात केली पाहिजे. दुस-या सूचनेसबधी फारसा वादविवाद करणे जरूर नाहीं; कारण त्या विषयावर म्हणण्यासारखा मतभेद नाही. हवे असल्यास दोन वर्ष कमी केलीं तरी माझा त्याबद्दल आग्रह नाही. मुरव्य शरीरसंरक्षणाचे तत्त्व लक्षात ठेविले म्हणजे दुस-या सूचनेवर जबर आक्षपयेण्याचा सभव नाही. आता तिसया य चवथ्या सूचनेविषयीही माझा विशेष ऊहापोह करण्याचा विचार नाही. इतकेंच की ४० अगर सर्वास पसंत वाटल्यास ४५ वर्षांपुढे लहान मुलीशीं लग्न करणे हे येोग्य नाही. दारू पिण्यासबधी मला असे वाटते की हे व्यसन इंग्रजी शिक्षणापासून आम्हांमध्य शिरले आहे. त्याबद्दल आपण आपली सुधारणा करणे अत्यंत जरूर sītā. Temperance Associations ‘बेतार्ने पान करणाच्या मंडळ्या' करण्यात हांशील नाहीं. अजिबात दारू पिणे बंद झाले पाहिजे. बालविवाह करूं नका असे म्हणणारे जे लोक आहेत त्यातच मुख्यत्वे मद्यपी सापडतात, तेव्हा त्यास माझे असें म्हणणें आहे की रूढिबलाने दृढ झालेलाबालविवाहरूपी दुराग्रह मनातून काढून टाकण्याबद्दल इतरास उपदश करण्यापेक्षा आधीं आपल्या स्वत:वर आलेले व्यसनपाश काढून टाकण्याचा निश्चय करा म्हणजे तुसच्या उपदेशासही बळकटी येईल. माझे मुख्य मत हेच की कोणतीही सुधारणा करणे ती नत्त्ववर्तकानी आधी केली पाहिजे. दारू पिण्याचे दुष्ट परेिणाम आपणास चोहोकडून ऐकू येतात. त्या व्यसनापासून आपल्या सुधारकानी पूर्णपणे. अलिप्त असल पाहिजे. तसेच या तत्त्वाचा लोकामध्ये प्रसार करण्याकरिता मिशनरी लोकांच्या संस्थेप्रमाणे एक संस्था करण्यासाठी आपल्या प्राप्तींचा काही एक अश-आकडा ठरावणे मडळीकडेच आहे-देत जाणे जरूर आहे. त्याचे योगाने देशात ठिकठिकाणीं सदरहू सुधारणेस लोकमत अनुकूल करण्याचा प्रयत्न करावयाचा, व स्वतःच्या उदाहरणाने, अशा प्रयत्नाने व त्यापासून होत चाललेल्या फायद्याच्या निदर्शनाने, सुधारणेचे पाऊल पुढे पाडावयाचे. अशा रीतीने विचार करून शदीनश जी काय मडळी तयार असतील त्यांनी आपल्या सह्यां देऊन आपणास सदहूं सुधारणा अमलात आणण्याविषयी बाधून घ्यावें व आपण केलेले नियम आपल्या मंडळीवर निर्बाध बजाविले जाण्याबद्दल सरकाराकडून आपले नियम नोंदवून घ्यावे अशा त-हेने लोकवर्तनाचे काम आज हजारों वर्षे ब्राह्मण करीत आले आहेत, व इंग्रजी शिक्षणानें तेच काम विशष चागल्या तहेन आपण करू लागल्याशिवाय इंग्रजी शिक्षणार्ने आपलीं भने प्रकाशित झाली असे मी समजणार नाही. असे भाषण झाल्यावर ऑनरेबल रावबहादूर रानडे यानी सुमारे पाऊण तासपर्यंत फार मनोवेधक व सप्रेम भाषण केले. त्यांतील मतलब असा की- हा वाद उपस्थित झाला आहे