पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुळशी बागेंतील सभा १०१ पूर्ण विचार होऊन काहीं तडजेोड पडावी. सभेचे अध्यक्षस्थान ऑनरेबल रावबहादुर नृलकर यानी पतकरले होते. अध्यक्षाच्या परवानगीने रा० टिळक यानी आपल्या आठ सूचनांसंबंधीं उपक्रम केला त्याचा मतलब येणें प्रमाणे:--आपल्या समाजाची सुधारणा करण्या साठी वाक्पाडित्य फार झालेले आहे. तथापि सुधारणा करावयाची ती कोणाची अशा प्रश्नाचा विचार करताना आपणाला जनसमूहाची सुधारणा करावयाची हें बीज आहे. याकरिता सुधारणेसाठी जनसमूहाची व आपली ताडातोड करण्याचा प्रयत्न केल्यास सुधारणा होणे इष्ट नाहीं. ह्यास उदाहरणे हीच की, पुनर्विवाहा सारख्या निर्विवाद सुधारणा इष्ट असून बहुतक सुधारकास त्या आपल्या कुटुंबात अमलात आणणे अशक्य वाटत आहे. याकरिता सुधारणा ही ज्याची त्यानें सुरू करून आपल्या उदाहरणाने दुस-याचे मन वळविण्याचा प्रथत्न केला पाहिजे. नाहीपेक्षा रिकामे शब्दपाडित्य करण्याचा काहीएक उपयोग नाही. तर सुधारक लोकाकडून सर्व लोकास सुधारण्याचा उद्देश धरून काय सुधारणा शक्य आहेत व त्या कोणत्या साधनानी अमलात आणाव्या याचा विचार करावा. माझीही मतें सुधारणेस अनुकूळ आहेत परंतु ती ह्याच तत्त्वास अनुसरून आहेत व म्हणूनच तीं आपणास अमलात आणण्यासारखी आहेत, असा माझा समज आहे. त्या तत्त्वाचे स्वरूप अशा तन्हेचे आहे की, समाजात सहज करण्यासारखे काय आहे, काहीं अडचणी सोसून अथवा टाळून करण्यासारखे काय आहे व मुळीच करता येणार नाही असे काय आहे ? म्हणजे आपल्या धर्मशास्त्रास अनुसरून कार्याकार्य गोष्टीस विधि, विकल्प व निषेध अशी तीन बधने घालता येतील. यात ज्या गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत त्या मुळीच करावयाच्या नाहीत. परंतु ज्याविषयी विधान आहे अथवा प्रायश्चित्त आहे त्या करण्यास जातिभ्रंशाचा प्रत्यवाय येऊं शकणार नाही; व ते धर्मसमजुतीच्या उलट जाणेंही होणार नाही. असा विचार करून धर्मशास्त्राचे उल्लेघन न करिता ज्या गोष्टी आपणास करिता येतील त्या आपण पुढे माडाव्या व त्याचा आपण विचार करून त्यासबंधे काही निकाल होत असल्यास पहावा असा आजच्या सभेचा उद्देश आहे. आता ह्यातील दरएक सूचनेस निरनिराळा विचार करणे जरूर आहे. मुलीचे लग्न सोळावे वर्षी केले म्हणजे ज्या कायद्यासंबंधाने वादविवाद चालू आहे त्याची आपणास जरूरच राहाणार नाहीं. आपल्या शास्त्रामध्ये जै वय घालून ठेविले आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की, अमुक एक वयाच्या इयतेपुढे सामान्यत: मुलीच्या शरीरावर यौवनलक्षणे दिसू लागतात. ती लक्षणे दिसू लागण्याच्या सुमारास विवाहकाल योग्य म्हणून शास्र समजते. या बयापुढे ऋतुप्राप्तीपर्यंत कोणत्याही काळी लग्न करण्यास हरकत नाहीं. ऋतु प्राप्त झाल्यास विवाहकालीं शाति केल्यानें धर्मसबंधीं अडचणीचे निरसन होतें. हा प्राचीन शास्त्रसंबंधीं विचार व अवीचीन समाजस्थितीसंबंधी विचार एकत्र केले म्हणजे ज्यास प्रवर्तक व्हावयाचे आहे त्यानी