पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ लो० टिळकांचे केसरींतील लेख त्याचप्रमाणें रा. ब. नारायण भिकाजी जोगळेकर यानीं हिंदुस्थानसरकाराकडे पाठविलेल्या अभिप्रायांत म्हटल्याप्रमाणे विधवाचे वपन बंद करणें; आणि विधवांच्या पुनर्विवाहास परवानगी देणे इत्यादि सुधारणा घडवून आणण्याविषयी तुळशीबागेत जमणाच्या हिंदुसमाजानें ठराव करावा हें योग्य आहे. ४. वरील सुचनांचा विचार हिंदुसमाजानें आपण होऊन न करिता कायदा करूं नये येवढाच मात्र सरकारास अर्ज करणे म्हणजे वे. शा. महामहोपाध्याय रामशास्त्री आपटे यानी म्हटल्याप्रमाणें काळावर नजर न देतां वागल्याप्रमाणे होईल. ५, आजच्या सभेपुढे ज्या सूचना येणार आहेत, त्यात वर लिहिलेल्या गेोष्टींचा विचार केला असेल तर उत्तमच आहे; परंतु त्या सूचनांत वरील गोष्टीचा उल्लेख नसेल तर आम्ही पुढील प्रतिसूचना आजच्या सभेपुढे आणणार आहों. ** आमच्या समाजातील बाल्यविवाह, कन्याविक्रय, बालवृद्धविवाह, विधवाकशवपन, इत्यादि गोष्टींपैकीं प्रत्येक बाबतीत समाजाकडून आपण होऊन सुघारणा करण्याचे संबंधानें आजपासून सहा महिन्याचे अांत सभा भरवून राजा पुतान्यांतील लोकानीं जसे नियम केले आहेत तसे नियम आपले लेोकस्थितीचे मानाने करण्याची व केलेल नियम अमलात आणण्याची झटून तजवीज करूं. ” पुणें, ता. २६ आक्टोबर सन १८९० इ. लक्ष्मण कृष्ण नूलकर, गोविंद वासुदव कानिटकर, রা. , হুহু, হুহু, শ্ৰী, बी. ए. एलू. एलू. बी’ रामचंद्र भिकाजी जाशी, सिताराराम गणेशा देवधर. अनंत दामोदर टेभे. ह्री नारायण आपट. नारायण सखाराम पानसे. नारायण बळवंत सरंजामे, बी. ए. वैजनाथ काशिनाथ राजवाड. एकनाथ महादेव पुराणिक. एम्. ए. अण्णाजी गणेश वागीकर. रामचंद्र मोरेश्वर साने. गंगाधर वामन लेल, बी. ए. महादेव दिनकर जोशी. वामन विष्णु केले, वकील. प्रभाकर गोविंद नरवणे. वासुदेव गणेश जोशी. काशनाथ बळवंत रानडे. उपप्रतिसूचना. रा. रा. तुळशीबार्गेतील सभासद यांस, आपण आज सामाजिक सुधारणेच्या कामीं सरकारनें कायदा करूं नये अशाबद्दल सरकारास अर्ज करण्याकरिता सभा भरविणार आहा, व त्यात वरील मजकुराचा अर्ज सरकाराकडे पाठविण्याकरितां लोकांपुढे आणणार आहां. सदरहूसंबंधानें आमची इतकीच विनंति आहे की, ज्यांस कायदा नके असेल त्याचे