पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुळशी बार्गेतील सभा ९७ तुळशीबागेतील सभा* आर्मत्रणपत्रिका येत्या रविवारी म्हणजे तारीख २६ माहे आक्टोबर सन १८९० रोजीं मि. मलबारीशेट वगैरे लोक यांच्या म्हणण्यावरून सरकारानें कायदा करून किंवा अन्य तन्हेनें आमच्या पूर्वापार चालत आलेल्या सामाजिक रीतिभातीत हात घालू नये, असा सरकारास अर्ज करण्याकरिता पुणे येथील लोकाची तुळशी बागेत संध्याकाळीं ४ वाजता सभा भरविणार आहोत; तर त्या वेळीं सर्वानी येण्याची अवश्य मेहरबानी करावी. मित्ती आश्विन शुद्ध १० शके १८ १२ रंगराव विनायक पुरंधेर. राम दीक्षित आपटे. खंडेराव विश्वनाथ रास्ते. बळवंतराव रामचंद्र (ऊर्फे बाळासाहेब नातू). कृष्णशास्त्री राजवाड. महादेव वासुदव बर्वे. भाऊ मनसाराम नाईक. काशिनाथ निळकठ खाजगीवाले. नारायण भिकाजी जोगळेकर. नरहर बाळकृष्ण पराजपे. वामनशास्त्री मराठे. प्रतिसूचना, वे. शा. महामहेोपाध्याय रामशास्त्री आपटे व तुळशीबागेत ता. २६ अक्टोबर सन १८९० रोजीं सभा भरविणारी मंडळी यास:-- विनंति विशेष. आम्हीं खालीं सह्या करणारे लोक पुढे लिहिल्याप्रमाणे विनंति करीत आहों, इकडे आपले लक्ष जावे. १. मि. मलबारी याच्या सूचनेप्रमाणे सामाजिक गोष्टींत सरकारने हात घालं नये अशी विनंति सरकारास करण्याचा जेो ठराव सभेत होणार आहे, त्याविषयी आमचे कांही म्हणणे नाहीं. २. आमच्यातील सामाजिक गोष्टीत हल्लीच्या काळास अनुरूप अशा सुधारणा केल्या पाहिजेत, असें महामहोपाध्याय रामशास्री आपटे यानीं सांगली येथें सागितल्याचे केसरीपत्रात प्रसिद्ध झाले आहे, त्याप्रमाणें तुळशीबार्गेतल्या आजच्या सर्भेत ठराव पसार करणें जरुरीचे आहे. ३. पुण्यातील आर्यधर्मप्रकाशक सभेच्या वतीनें महामहोपाध्याय रामशास्त्री यांनी मेहेरबान वेडरबनसाहब यास संस्कृत भाषेत लिहिलेलें जे मानपत्र दिले, त्यांत कन्याविक्रय, बालावृद्धविवाह व बाल्यविवाह या तीन बाबतीत निबंध करण्याविषयीं मजकूर होता, त्याप्रमाणें हिंदुसमाजाजाने निबंध करणे;

  1. ता, २८ आक्टोबर १८९० १२