पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुळशी बागेंतील सभा ९९ म्हणणें आपण सरकारास रीतीप्रमाणे कळवालच. परतु जर कोणाचा काहींएक सुधारणा करण्याचा निश्चय असून त्याप्रमाणें करणार त्यांस बरेच लोक मिळाल तर त्यांपैकीं जे वचन दिल्याप्रमाणें वर्तन करणार नाहीत, तर त्यांस सरकारातून कडक शिक्षा मिळावी, एवढयाचबद्दल आमच्यातर्फे सभेपुढे ठराव आणून त्यास एका ज्ञातीचे निदान दीडशे दोनशें लोक मिळाल्यास त्यांच्या सह्या घेऊन तो अर्ज सरकाराकड पाठवून देण्याची तजवीज करावी. आजमितीस ज्या सुधारणा होणें इष्ट आहेत त्या १ मुलीचे लग्न १६ वर्षाचे अांत करूं नये. १ वीस वर्षाचे आत मुलाचे लग्न करूं नये. १ पुरुषाचे लग्न ४० वर्षापुढे होऊ नये. १ चाळीस वर्षापुढे लग्न करणें झाल्यास विधवेशीं विवाह करावा. १ दारू पेिणे बंद असावें. १ हुंडा घेण्याची चाल अजीबात बंद करावी. १ प्राप्तीचा दहावा भाग सार्वजनिक कामाकडे द्यावा. [ या मंडळीच्या कामी ] १ विधवेंचे वपन-करूं नये. या सर्व गोष्टी ज्यास कबूल आहेत त्याच्या सह्या घेऊन वर लिहिल्याप्रमाणे करण्याची मेहेरबानी व्हावी. कळावें, ता. २६ आक्टोबर १८९० इ० बाळ गंगाधर टिळक. गोपाळ रघुनाथ नंदरगीकर, गोपाळ विनायक जोशी. विष्णु अनंत पटवर्धन. वासुदव गणेश जोशी विनायक त्रिबक चिपळूणकर. सिताराम गणेशा देवधर. रामचंद्र भिकाजी जोशी. विनंति. आजच्या सर्भेत समाजाची सुधारणा कायद्याच्या मदतीनेंच करावी असे म्हणणाया मंडळीकडून अशी सूचना यावयाची आहे कीं समाजसुधारणेच्या कामी कायदा नको असें ठरविताना अमुक मुदतीच्या आत आम्ही अमुक अमुक सुधारणा करूं अशा प्रकारचे सभेर्ने बंधन करून घ्यावे. तशा प्रकारचे बंधन करून घेतल्यास ही मंडळी तितकी मुदतपर्यंत वाट पाहाण्यास तयार आहे. मात्र बंधनाप्रमाणें समाजाकडून कृति न घडल्यास ते पुनः त्या मुदतीनंतर कायदा मागण्याची खटपट करतील. यावर माझी प्रतिसूचना अशी आहे की कायद्याची मदत घेऊन साच्या समाजावर एकदम सुधारणा लादण्यापासून फायदा न होतां गैरफायदाच होण्याचा संभव आहे. तेव्हां ज्यांना सुधारणेची खरी कळ कळ आहे त्यांनी पुढील सुधारणा अंमलात आणण्याबद्दल आपल्या स्वत:सच