पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ लो० टिळकांचे केसरींतील लेख अजीतील आणखी मुद्दा असा आहे कीं, यम, पराशर वगैरे संस्कृत धर्मग्रंथांत व सुश्रुतादि वैद्यकग्रंथांत जो आचार आहे तोही कायद्याची सुधारणा करण्यास अनुकूल असाच आहे, तेव्हा सरकाराने कायद्यांत फरक केला असतां कोणत्याही रीतीनें धर्मीत हात घातल्याचा सरकारावर आरोप येणार नाहीं. या मुद्दयावर आमचे इतकेंच म्हणणे आहे की, यम व पराशर हे शेोधून पाहात त्यात आम्हांस तर मसुद्यांत लिहिल्याप्रमाणें एकही वचन आढळले नाहीं. फक्त सुश्रुतांत एके ठिकाणीं ** पंधरा वर्षाच्या आतील स्त्रियेस मूल झाले असता तें जगत नाहीं किंवा दुर्बळ होतें.” असे लिहिले आहे. पण येवढयावरून अर्जीतील मजकुराचे पुष्टीकरण कसें होतें ते आम्हास समजत नाहीं. लहान मुलामुलींचा शरीरसंबंध लवकर न होऊं देणें हा भाग गृहव्यवस्थेतील आहे. त्याचा व घोडनवयानी आपल्या अल्पवयस्क बायकावर बलात्कार करूं नये याचा संबंध काय ? वर जे चाळीस खटले सागितले त्यात दहा वर्षाची मुलगी व १४ किंवा १५ वर्षाचा मुलगा अशी उदाहरणे किती सांपडतील ? मुळीच नाही म्हटले तरी चालेल. परतु एवढा मोठा भद मसुदा गावोगांव पाठविणाच्या मंडळीच्या लक्षात येतो कशाला ? सुधारक म्हणवून घेण्यात सुधारकाच्या कपूंत मोडण्यात ज्यास भूषण वाटते किंवा परभरिच्या परभरेि सुधारणा होत असता ती घडवून आणण्यात ज्याचा पाय सदैव पुढे असतो असे सुधारकाग्रणीही जर एक बायको मेल्यानंतर तिचे दिवस होण्यापूर्वीच वयाच्या अंतराकडे न पाहता आपली नात शोभल अशा दहा वर्षाच्या परीिशीं लग्न लावण्यास तयार असतात, व असा घोडविवाह करूनहीं फिरून समाजात हिडण्यास, फिरण्यास किंव। सुधारणेच्या अधळपघळ गोष्टी बोलण्यास त्यास दिक्कत वाटत नाहीं, तर ते या गोष्टीकडे कशास लक्ष देतील ? परंतु लोकानीं तरी निदान या गोष्टीचा अवश्य विचार केला पाहिजे. चेोरास शिक्षा व्हावी हे रास्त आहे, परतु तत्पूर्वी चेोर कोण याचा जसा निर्णय होणें अवश्य आहे, तद्वतूच या प्रकरणाही जे गुन्हे घडतात असे मसुदाकाराचे म्हणणे आहे त्यांत गुन्हेगार कोण व त्यांचा प्रतिकार करण्यास हल्लीच्या कायद्यात फेरफार पाहिजेच असल्यास तो काणता याचा प्रथमत: नीट विचार झाला पाहिजे. हल्लीं जो मसुदा आमच्यापुढे आहे यात अशा त-हेचा बिलकूल प्रकार नसून उलट ** अशा त-हेचे गुन्हे घडतात;-कारण बालविवाह;-अतएव ‘अजापुत्रं बलिं दद्यात्' या न्यायानें पिनलकोडात अवश्य सुधारणा केली पाहिजे.” अशाच मासल्याचा केोटोक्रम आढळतो. तेव्हा लोकांस आमची इतकीच विनंति आहे कीं वरील अजांवर सह्या करण्यापूर्वी खरे “ चोर ” केोण याचा नीट विचार करून मग त्यानीं जें करणे असेल तें करावे.