पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कायदा मागण्याचा अर्ज. ९५ आतां मसुद्यांतील इतर मुद्यांकडे वळू. वर आम्हीं दर्शविलेंच आहे कीं, अशा तन्हेची कायद्यांत सुधारणा करण्याची आज कांहींएक जरूर नाही. यावर केोणी असें विचारतील कीं, नुकतीच कलकत्त्धांत घडलेली फुलमनी बाईची हकीकत वाचून तरी आमच्या मतांत कांही फेरफार झाला आहे कीं नाहीं ? अजांचा जो मसुदा गांवोगांव पाठविण्यांत आला आहे त्यांत असें लिहिले आहे की * हिंदुस्थानच्या दोन इलाख्यांत लहान मुलीवर बलात्कार केल्याचे १००वर्षात ४० खटले कोर्टापुढे आले आहेत व त्यात कित्येक मुली बळीही पडल्या आहेत. तेव्हां हा राक्षसी प्रकार वंद करण्यास कायद्याचा कांहीं तरी प्रतिबंध नकी काय ?’ सकृद्दर्शनीं या प्रश्नांत काहीं महत्ध असावें असें एखाद्यास वाटण्याचा संभव आहे; परंतु जरा विचार केला असतां त्यातील पोकळपणा तेव्हांच नजरस येईल प्रथमतः शंभर वर्षात दोन इलाख्यात अशा मासल्याचे ४० खटले होणें म्हणजे काही फार भयंकर स्थिति नाही. खुनाची संख्या याहीपेक्षां जास्त असते, पण तेवढयावरून सर्व हिंदु ढोक खुनी आहेत असे ज्याप्रमाणें सिद्ध होत नाहीं त्याचप्रमाणें वरील उदाहरणांवरून लहान मुलीवर बलात्कार करण्याची लोकांस संवयच आहे असेही मानता येणार नाही. बरे हें जे ४० गुन्हे झाले म्हणून म्हणतात त्यातील सर्व आरोपीस कायद्याप्रमाणें शिक्षा झाली आहेना ? मग आतां नवीन कायदा कशाला ? हल्लीच्या कायद्याने जी शिक्षा ठेविली आहे ती व लोकलज्जा याचे आज ज्यास भय वाटत नाहीं, तो नुसता दोहाच्या ठिकाणी पांच वर्षे शिक्षा कायद्यात वाढविल्यानें कांही जास्त विचारी होईल काय ? होईल असें आम्हांस वाटत नाहीं. तर मग कायद्यात फेरफार कशास पाहिजे ? फुमलनोच्या खटल्यात नामदार बुइलसन साहेब यानीं नवयास शिक्षा देताना जो ठराव सागितला त्यांत स्पष्ट असे सागितले कीं, ** हल्लीच्या पिनलकोडाप्रमाणे दहा वर्षाच्या आंतील स्वस्रीवर नव-यानें बलात्कार केल्यास जबर शिक्षा आहे, इतकेंच नव्हे तर पुढेही समागमापासून जर बायकोस इजा होईल तर त्यासही कायद्यांत शिक्षा सांगितली आहे, ’ अशा तञ्हेनें हल्लींच्या पिनलकोडाचा अंमल चालत असता कोणत्या तरी मिषार्ने सरकाराने एकदा या प्रकरणात हात घालावाच असा जेो आमच्या सुधारकांचा उद्योग सुरू आहे त्यांतील हेतु काय असावा याची आम्हांस तरी कल्पना करता येत नाही. इंग्रज लोकांतील घटस्फोटाचे वाईट वाईट खटले केोर्टापुढे येतात त्यावरून त्याच्यामधील विवाहपद्धति बरीच दोषाई असावी असें भर समाजांत बोलल्याबद्दल प्रेोफेसर जिनसीवाले यांच्यावर ज्या लोकांनीं गहजब करून सोडिला, त्यांनीच आमच्यांत पोरीवर बलात्कार केल्याची काही उदाहरणें सापडतात येवढयावरून आमच्या राष्ट्रास दोषी ठरवावे व कायद्यांत फेरफार करण्याकरितां आम्हास सरकारांत अर्ज करण्यास सांगावें, यापेक्षां आमच्या हतवीर्यतेचा दुसरा पुरावा तो कोणता ? इंग्रज लोकांसंबंधानेंच जर असे कोणी अनुमान काढिलें असतें तर त्याची त्या लोकांनीं काय दशा केली असती बरें ?