पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ ली० टिळकांचे केसरींतील लेख करितां जिवापाड श्रम करून खुद्द राघेोबादादा पेशवे यांसही जी मदत संपादण्यास महाप्रयास पडले, ती आपोआप तुमच्या घरी आणिली आहे. आता सर्व भिस्त तुमच्यावर आहे. तर उठा व उद्योग करा म्हणजे माझ्या हातास बळकटी येईल.” शेटजींचे असें आज्ञापत्र आल्यावर इकडे त्यांच्या शिष्यांची काय अवस्था झाली असेल याची वाचकांनींच कल्पना करावी. मुंबई, पुणे येथे तर दहा दहा पाच पांच सुधारक एकत्र मिळून भराभर प्रायव्हेट (खासगी ) सभा व खलबर्ते चालू आहेत, व सर्वानुमतें * मलबारी शेटजींचे हात आता पुर बळकट केले पाहिजेत ? असें ठरत आहे ! आणि त्याचप्रमाणे काहीं नाहीं तरी निदान हल्लीं पेिनलकोडातील ३७५ कलमात स्वस्रीशीं दहा वर्षाच्या आत समागम केल्यास जी शिक्षा आहे तिची कालमर्थादा वाढवून दहाच्या ठिकाणी बारा वर्षे करण्याबद्दल सरकारास लोकांकडून अर्ज पाठविण्याची तजवीज करावी असे ठरून गावोगांव सह्या घेण्याकरितां अजांचे मसुदेही पाठविण्यांत आले आहेत असे ऐकतो. तेव्हा आज या मसुद्याबद्दल आम्हीं येथे थोडासा विचार करणार आहों; लहानपणीं लग्न झाले असता बायको वयात आल्यावर तिला तें मोडता यावें वगैरे मलबारी शेटजींनी जीं सुधारणेचीं नवीं तत्त्वें काढली आहेत त्यांवद्दल व तत्संबंधानें इकडील सुधारकांच्या चळवळीबद्दल मागाहून लिहूं. या मसुद्याकडे पाहिले असता पहिला असा प्रश्न उत्पन्न होती कीं दहाच्या ठिकाणीं बारा वर्षे करण्याकरितां आज अर्ज करण्याची काय जरूर आहे ? मल. बारी शेटजींच्या एका स्नेह्यानें या विषयावर मागे एक निबंध लिहून तो शेटजींनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें सर्वाकडे मत घेण्याकरिता पाठविला होता. या निबंधकाराचे असें म्हणणें होते की इंग्लंडात सोळा वषांच्या आत कोणत्याही स्रीशीं समागम निषिद्ध आहे व त्याचप्रमाणे हिंदुस्थानातही असणे अवश्य आहे; परंतु या विषयावर त्या वेळी जेो वादविवाद झाला त्यावरून असे दिसून आले कीं, एखाद्यास कावीळ झाली म्हणजे त्यास जसे सर्व जग पिवळेच दिसू लागतें, त्याप्रमाणेच शेटजींच्या मित्राची अवस्था झाली होती. या कामों कायद्यांत दिलेली वयाची यत्ता वाढली पाहिजे असा मनाचा ग्रह झाल्यामुळे या निबधकारास इंग्रजी कायदाही तसाच भासू लागला व त्यासरशी कागद व पेन घेऊन जी त्यानै आपल्या कल्पनेनें तसबीर काढिली तीही तशीच वठली. वस्तुत: पाहतां अशा त-हेची हिदुस्थानच्या कायद्यात सुधारणा करण्यास इंग्रजी कायद्याचा कोणताही आधार नाहीं, व ही गोष्ट प्रमाणसिद्ध असल्यामुळे सुधारकासही ती पुढे ग्राह्य करावी लागली. हल्लींच्या मसुद्यांत इंग्रजी कायद्यावर फारसा जेोर दिलेला नाहीं, तथापि सरतेशेवटीं** पेिनलकाडांतही सुधारणा केली असतां आमचा कायदा इंग्रजी कायद्याशीच नव्हे तर एकंदर लोकरीतसिही जुळून राहील ” असे म्हटलें आहे. कोणतीही गोष्ट एकदा मनात शिरली म्हणजे मग ती खेाटी असली तरी निघण्याची किती मारामार पडते याची थोडीशी कल्पना यावरून करिता येईल.