पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर यांचे अपूर्व युक्तिचापल्य. ५७

म्हणजे जर एखाद्या स्त्रीचा एखाद्या पुरूषावर भाव बसला असेल तर ऋतु पालटण्यापूर्वी तिचा संग्रह केला असतां प्रजा इच्छित पुरूषाप्रमाणे होते म्हणून ऋतु पालटेपर्यंत तिचा संग्रह करू नये. तेव्हां "व्यभिचारादृतौ शुद्धि:" हें वाक्य मानसव्यभिचारविषयक आहे असें जें विज्ञानेश्वरांनी ठरविलें आहे तेंचे योग्य आहे. तसेंच "गर्भेत्यागो विधीयते" यांत "त्याग" शब्दाचा अर्थ "निरुंध्यादेकवेश्मनि" या पूर्वोक्त मनुवाक्याशीं एकवाक्यता करण्याकरिता "त्यागश्चोपभोगधर्मकार्ययो: न तु निष्कासनं गृहात्" त्याग म्हणजे धर्मकार्य व उपभोगाकरितां, घरांतून घालवून देणें नव्हे असा केला आहे. एवंच विज्ञानेश्वरानीं याज्ञवल्क्यस्मृतींतल्या वचनांचा परस्पराशीं व मनुवचनाशीं विरोध न आणिता शास्त्रीय सरणीनें दोघाचा सुरेख मेळ घालून दिला आहे.

आतां रा.ब.नी येतें कसें गौडबंगाल केले आहे तें दाखवून आमचा लेख आटपतो. व्यभिचारी पूरूषांचा स्त्रियानीं नेहमीं जर संग्रह करावा तर व्यभिचारी स्त्रियाचा पुरूषानीं का करू नये. असा त्याचा सुधारलेला समज असल्यामुळें "व्यभिचारादृतौ शुद्धि:" हें वाक्य पाहिल्याबरोबर आनदाच्या भरांत त्यास टीकेचे विस्मरण झालें असावे; व त्या वाक्याचा त्यांनीं आपल्या बुद्धीनें "व्यभिचारिणी स्त्रिचा ऋतु पालटल्यावर संग्रह करावा" असा सरळ अर्थ लावून सोडिला. पण पुढचें वाक्य पाहतात तों "गर्भे त्यागो विधीयते" रावबहादुरांच्या मते तर व्यभिचारिणी स्त्रीचा सग्रह झाला पाहिजे, तेव्हां ते एकदम म्हणाले असतील, काय, "त्याग?" हा बेटा एक अपशकुनच झाला ! लवकर टीका पहा. तो त्याच्या दृष्टीस "त्यागस्चोपभोगधर्मकार्ययो: न तु निष्कासनं गृहात्" एवढीच विज्ञानेश्वराची व्याख्या पडली असावी; ए-हवी त्यांची न्यायी दृष्टि अशी व्यभिचरित झाली नसती ! एका श्लोकपादाची टीका दिसते व दुस-याची दिसत नाही यास दुसरे काय बरें कारण असावें? अथवा रा.ब.चें संस्कृतज्ञान बेताबाताचेंच असल्यामुळें त्यास शास्त्रीबुवांनी कादचित् मागची टीका दाखविलीच नसेल? पण मग रा.ब. नी या अव्यापारेषुव्यापारात पडावे तरी का? वाचकहो ! आमची मति येथें अगदीं गुंग झाली आहे. करितां रा.ब.च्या हातचलाखीचा व धार्ष्ट्याच्या हा जो नवीन मासला तुमच्यापुढें मांदिला आहे त्यची मनन करण्याकरिता तुम्हास सात दिवसांची फुरसत देतों. इतक्या मुदतींत तुम्हास हें कोडें उलगडलें तर बरेंच काम झालें.