पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ लो. टिळकांचे केसरींतील लेख

आमचे विज्ञानेश्वर बिचारे पडले भोळे ! त्यांस याज्ञवल्क्यस्मृतीची पूर्वोक्त मनुस्मृतीशीं त्याचा ग्रंथ लावण्याच्या पद्धतिप्रमाणें करणें जरूर होते. शिवाय याज्ञवल्क्य स्मृतींतही व्यभिचारास -

स्रीनिषेधे शतं दंड्या द्विशतं तु दमं पुमान्
प्रतिषेधे तयोर्दंड: यथा संग्रहणे तथा |
सजातौ उत्तमो दंड: आनुलोम्ये तु मध्यम:
प्रातिलोम्ये वध: पुंस: नार्या: कर्णादिकर्तनं |

असा राजदंड सागितला आहे. उत्तम म्हणजे हजार व मध्यम म्हणजे पाचशें; हा दंड दोघासही सारखाच. तेव्हा मनुस्मृति जरी क्षणभर बाजूस ठेविली तरी ज्या याज्ञवक्ल्यांनी व्यभिचारास एवढा राजदंड सागितला ते ऋतु पालटला म्हणजे व्यभिचारिणीचा संग्रह करावा असें कसे म्हणतील? दुसरें, मनूने व्यभिचारिणी स्त्रीस घरात ठेवून प्रायश्चित्त द्यावें असें "यत्पुंस:" इ. वचनांत सांगितले आहे. याज्ञवक्ल्य सांगतात की "गर्भे त्यागो विधीयते" गर्भ धारण झाला असतां तिचा त्याग करावा. तेव्हा आता याविरुद्ध वचनाची व्यवस्था कशी लावावी? विज्ञानेश्वरांनी मनुस्मृतींतील व खुद्द याज्ञवल्क्यस्मृतींतील वचनाशीं या वचनांचा विरोध न यावा म्हणून "व्यभिचारात्" याची "अप्रकाशितान्मनो व्यभिचारात् पुरूषातरसंभोगसंकल्पात् यदपुण्यं तस्य ऋतौ रजोदर्शने शुद्धि:" म्हणजे व्यभिचार मानसिक असला तरच ऋतु पालटल्यावर त्याची शुद्धि होती अशी व्याख्या केली आहे. मानसव्यभिचारही करूं नये असें "मनोवाग्देहसंयता" इत्यादि पूर्वोक्त मनुवाक्यात सागितलेच आहे. शिवाय मनूनेंच ५ व्या अध्यायात:--

मृत्तौयै: शुद्धते शोध्यं नदी वेगेन शुध्यति
रजसा स्त्री मनोदुष्टा संन्यासेन द्विजोत्तम: |

भांडे वगैरे यांचे माती लावून घांसल्यानें, नदीची वेगानें, मनोदुष्ट स्त्रीची म्हणजे कुल्लूकादि टीकाकारांच्या मतें मानसव्यभिचारापासून स्त्रीची ऋतु पालटल्याने व ब्राह्मणाची संन्यासानें सुद्धि होते असें सागितले आहे. असें समानार्थक वाक्य मनूंत असतां 'वभिचारादृतौ शुद्धि:' या वाक्याच्या विज्ञानेश्वरकृत अर्थाबद्दल आतां काहीं शंका आहे काय? मानसव्यभिचारही कां निषिद्ध मानिला याचीं कारण वीरमित्रोदयकारानीं शंखलिखित स्मृतींतून खालीं लिहिल्याप्रमाणें दिलें आहे:-- अतएव आहतु: शंखलितौ यस्मिन् भावो र्पित: स्त्रीणामार्तवे तच्छीलं पुत्रं जनयतीति | मानसव्यभिचारादपि स्त्रियं रक्ष्येदिति शेष: | तथा च मनुना 'तस्मात्प्रजाविशुद्धयर्यं स्त्रियो रक्ष्येरत्प्रयत्नत:' इअयादिनायमेवार्थो दर्शित: |