पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ लो. टिळकांचे केसरींतील लेख

*रावबहादुर रानडे यांचें अपूर्व युक्तिचापल्य
(मागील अंकवरून पुढे चालू.)

सभा वा न प्रवेष्टव्यं वक्तव्य वा समंजस

--मनु:

मागील अंकी आम्हीं या विषयाच्या संबंधाने जे विवेचन केलें आहे त्यावरून महाभारतात तत्कालीन नव्हे तर फार पुरातन रानटी स्थितीचें जें वर्णन केले आहे त्यात व मनुस्मृतिकाली विवाहादि संस्कारांनी नियमित झालेल्या गृहस्थितींत किती अंतर आहे ते मनात न आणितां व मागील पुढील वचनाचा विचार न करितां केवळ स्वपक्षसमर्थनार्थ आपल्या पूर्व मनोदयानुरूप रा.ब.नीं स्मृतिवचनांशी कसें साहस केलें आहे हें वाचकाचे लक्षात आलेच असेल. रा. ब. नी स्मृतिवचनांचे खरोखर अर्थ प्रथमत: देऊन जर मग ते आपणांस पसंत नाहींत असें म्हटले असते तर गोष्ट निराळी होती. कारण मग आमच्या धर्मशास्त्रावर रा.ब. प्रमाण किंवा विज्ञानेश्वरादि ग्रंथकार प्रमाण याचा लोकानी विचार केला असता. परंतु तसे न करिता आपणास अनुकूल तेवढी टीका उचलावयची व बाकीच्याचे मुकाट्यानें मन:पूत अर्थ लावावयाचे आणि अखेरीस "सर्व वचनाचा विचार करण्याचा माझा अधिकार नाही ... क्वचित् स्थळी माझ्याविरुद्ध एखादे वचन सांपडेल, परंतु स्मृतिग्रंथाचा विचार करिताना एखाद्या दुस-या वचनावरच कटाक्ष ठेवून निर्वाह होत नाहीं, एकंदर शास्त्रसरणीचा विचार करावा लागतो." असे आत्मसौजन्याची व स्वपक्षाभिमानाचे एकसमयावच्छेदेंकरून कथन करावयाचें या प्रकारास काय म्हणावें याचा वाचकानीच विचार करावा स्मृतिग्रंथाशीं युक्तिवाद करण्याची हवी त्यास मोकळीक आहे, पण ती धर्मशास्त्र या नात्यानें नाही हे रा.ब. नीं लक्षात ठेवावयास पाहिजे होतें. धर्मशास्त्र पाहणें असल्यास ते त्याच्या सरणीनेंच पाहिलें पाहिजे. अस्तु; या विषयावर जेवढी चर्चा होईल तेवढी रा.ब. इष्टच आहे. करितां आपण पुढील विवेचनास लागूं.


अधिवेदन

रा.ब.चा, तिसरा व मुख्य मुद्दा अधिवेदनाचा होय. पतीचा त्याग करूं इच्छिणा-या "स्त्रीची गणना साहसादि कर्म करणा-या स्त्रियांत न होता अधिवेदन ज्या स्त्रीच्या संबंधाने सागितले आहे अशांत होईल व ज्या अर्थी अधिवेदनाबद्दल नव-यास दड सागितला नाही, तेव्हा स्त्रियांस दंड सांगतील हा संभव नाही;" अतएव, पति न आवडल्यास त्याचा त्याग करणा-या स्त्रीस


  • (ता. १४ जून १८८७)