पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर रानडे यांचें अपूर्व युक्तिचापल्य ४७

देशजातिकुलांना च ये धर्मा: प्राक्प्रवर्तिता:
तथैव ते पालनीया: प्रजा प्रक्षुभ्यते न्यथा |

असे बृहस्पतिवचन आहे व हा पक्ष सर्व शास्त्रकारांस संमत आहे.

ह्यावरून वेद, स्मृति व (शास्त्राविरूद्ध असला तरी) देशाचार इतक्यांचा धर्माचा निर्णय करतेवेळीं विचार केला पाहिजे असें स्पष्ट होतें. रा. ब. सच तें कसें दिसलें नाहीं कोण जाणे ? असो. आता याच्या सरणीचा विचार करूं. वेद, स्मृति व आचार इतकीं जर प्रमाण धरलीं तरी निरनिराळ्या वेद व स्मृतिग्रंथातून निरनिराळी इतकी विरुद्ध वचनें सांपडतात की त्यांची सरणी किंवा व्यवस्था एकदा ठरवून ठेविल्याखेरीज त्याचा अर्थ कधीही नीट लागणार नाहीं. विरूद्ध वचनाची व्यवस्था लावणें याचींच नांव सरणी. सर्वच स्मृतिकार जर आपणास प्रमाण तर त्याची जितकी निरनिराळी वचने, तितके निरनिराळे धर्म न मानता त्यातून एक अर्थ निष्पन्न केला पाहिजे. रा. ब. ची व्यवस्था कोणती हें आम्हांस माहीत नाहीं. तथापि स्मृतिकार व टीकाकार हे जी व्यवस्था लावतात तीच त्याचे ग्रंथ आम्हास प्रमाण असल्यास आम्ही मान्य केली पाहिजे. वेद व स्मृति यात युक्तिवाद उपयोगी नाही. मनूनें म्हटलें आहे: -

योवमन्येत ते मूले हेतुशास्त्राश्रयाद्विज:
स साधुभिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिंदक:|

म्हणजे जो त्या मूलग्रंथाशी (श्रुतिस्मृतीशी) युक्तिवाद करून त्याचा अवहेलना करतो तो नास्तिक समजून त्यास बहिष्कृत करावा. महाभारतातही :-

पुराणं मानवो धर्म: सागो वेदश्चिकित्सितं
आज्ञासिद्धानि चत्वाति न हंतव्यानिहेतुभि:|

असा युक्तिवादाचा निषेध केला आहे. करितां 'जुक्ति' सोडून धर्मग्रथाची व्यवस्था लाविली पाहिजे. ती स्मृतिकार व टीकाकार अशी लावतात की, जर दोन श्रुति विरूद्ध आल्या तर दोन धर्म आहेत असें मानावें. मनूंत सागितले आहे:-

श्रुतिद्वैध्यं तु यत्न स्यात्त्त्र धर्मावुभौ स्मृतौ |

आता मनुस्मृतीबद्दल म्हटलें म्हणजे सर्व स्मृतींमध्यें स्मृति मुख्य; बृहस्पतीनें म्हटलें आहे-

वेदाथत्वोपनिबंधृत्वात् प्रामाण्यं हि मनो: स्मृतं
मन्वर्थविपरीता तु या स्मृति: सा न शस्यते|

म्हणजे मनुस्मृतीच्याविरूद्ध जर दुसरे स्मृतीत वचन असेल तर तें फुकट. तेव्हा मनुस्मृति मुख्य धरून ती जेथें अस्पष्ट किंवा अपुरती असेल तेथे दुस-या स्मृतीच्या वचनाची तिची स्पष्टार्थता किवा पूर्णता करावयाची. ही जी सर्व स्मृतींची एकवाक्यता करण्याची सरणी तीच कुल्लूक, विज्ञानेश्वर, नीलकंठ वगैरे