पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ लो. टिळकांचे केसरीतींल लेख

रा. ब. स मान्य असलेल्या ग्रंथकारानी घेतली आहे व तिचाच आम्ही पुढील विवेचनात आश्रय करणार. म्हणजे प्रथमत: प्रत्येक प्रकरणीं मनुस्मृतींत काय आहे ते सागून, नंतर इतर स्मृतींचा व त्याचा मेळ घालून काय निष्पन्न होतें ते पाहूं. कुल्लूकभट्टानीं आपल्या टीकेंत एके ठिकाणी म्हटले आहे: --

प्रायशो मनुवाक्येपु मुनिव्याख्यामह्ंलिखन्
नापराध्यो स्मि विदुषां क्काहं सर्वविद: कुधी:|

माझ्याकडे अपराध येऊं नये म्हणून मनुस्मृतीवर इतर स्मृतीचा आशय मनात आणूनच मी टीका केली आहे. तात्पर्य, स्मृतीचा अर्थ करण्याची सरणी म्हटली म्हणजे अर्धे वाक्य दाबून अर्धे वाक्य बाहेर काढणें किंवा युक्तिवाद करणें नव्हे; तर मनुस्मृति मुख्य धरून सर्व स्मृतीची होईल तेवढी एकवाक्यता करणें ही होय. अशी एकवाक्यता झाल्यावर मग देशाचार पाहावयाचा. तो स्मृतिप्रमेयास अनुकूल असल्यास ठीकच आहे. नसल्यास तोच प्रमाण.

स्त्रियांची स्वतंत्रता

आता या प्रमाणग्रंथावरून या सरणींने रावबहादुरांनीं दाखविलेले सिद्धांत कितपत खरे ठरतात तें पाहू. रा. ब. चा सामान्य सिद्धात असा आहे की स्त्रियास पूर्वकालीं पुष्कळ स्वतंत्रता असे, व 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' असें हे मनुवचन आहे त्याचा अर्थ फार संकुचित केला पाहिजे. सदर वचन मनुस्मृतींत ९ व्या अध्यायात आहे. व त्या मागील श्लोक व चरण खाली लिहिल्याप्रमाणे आहेत :-

अस्वतंत्रा: स्त्रिय: कार्या: पुरुषै स्वैर्दिवानिशं
विषयेषु च सज्जंत्य: संस्थाप्या आत्मनो वशे|
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने
रक्षन्ति स्थाविरे पुत्रा: न स्त्री स्वातंत्र्यमर्हति |

याचा अर्थ अल्लूकादि टीकाकार असा करितात की, स्त्रियाचे मन जात्याच बाहेरील विषयाकडे जातें म्हणून त्यास नेहेमी आपल्या ताब्यात ठेवावें. लहानपणी पित्याने, तरूणपणी पतीने व वृद्धापकाळी पुत्रांनी तिचें रक्षण करावे. स्त्रीस केव्हाही स्वातंत्र्य नाही. रा. ब. म्हणतात 'रक्षण करावें' याचा अर्थ टीकाकारांस इतकाच संमत आहे की स्त्रीनें स्वतंत्र रीतीनें उदरपोषण करूं नये; ती जबाबदारी पिता, पति व पुत्र यांजवर येते. पण ही रा. ब. ची कल्पना शुद्ध स्वकपोलकल्पित आहे. रा.ब. म्हणतात तसा अर्थ कोणत्या टीकाकारानी दिला आहे हें तें सांगतील काय ? मनूच्या मेधातिथि कल्लूकप्रभृति सहा टीकाकारापैकी एकानेही असा अर्थ केला नाही असें आम्हीं त्यास खात्रीने सागतों. लहानपणीं पुत्राचे पालन करण्याचा ज्याप्रमाणे पित्याचा अधिकार आहे तसाच हा अधिकार आहे. "न स्त्री स्वातंत्र्यमर्ह्ति" हा पहिल्या तीन चरणाचा सामान्यवाद आहे व स्त्रियांस कोणत्याही स्थितीत स्वतंत्रतेनें व्यवहार करतां येत नाहीं