पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावबहादुर रानडे यांचे अपूर्व युक्तिचापल्य ४३

पूर्ण झाला अशी जोंपर्यंत समजूत आहे तोंपर्यत असा विवाह झाल्यावर नावडता नवरा टाकण्याचा हक्क स्त्रीस प्राप्त होत नाहीं असे जे हायकोर्टानें ठरविलें तेच योग्य आहे. संमतीखेरीज आमचे विवाह पूर्ण नाहीत असा ठराव झाला तर आमच्या पैकीं आपल्या वडिलाचे किती औरस पुत्र निघतील याचा विचार संमतीमताभिमान्यांनी केला आहे काय ? बरें, असा ठराव झाला तर तो मानील तरी कोण ? हायकोर्टाचा ठराव लावून काहीं आमचीं लग्ने होत नसतात. सारांश, कोणत्याही दृष्टीनें पाहिलें तरी हायकोर्टाने हल्लीं केलेला ठराव हिंजुधर्मशास्त्राप्रमाणें असून अगदी योग्य आहे असें कबूल करावे लागते. मग इउत्तर आमच्या सुधारकाच्या दीर्घप्रयत्नानीं आमची विवाहाची रीत बदलून इंग्रजी पद्धतीवर जाईल तेव्हा त्याचा विचार निराळा ! आता कित्येंक असें म्हणतात कीं, हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे रखमाबाईचा हक्क शाबीत होत नाही हे खरें, तथापि ती नव-याकडे न गेल्यास तिला तुरुंगात पाठविणें योग्य होणार नाहीं. कारण तुरुंगाची शिक्षा हिंदुधर्मांत सागितली नाही. कोटी ठीक आहे; तथापि हायकोर्टास आपला ठराव अमलांत आणण्याचे जर काहीं साधन नाही तर त्यास निवाडा करण्यास तरी सांगण्यात काय हशील ? पूर्वी अशा तंट्याचा निकाल जातींतील पंच करीत असत; व त्याचा अधिकार असा असे कीं, ते हात धरून बायकोस नव-याचे स्वाधीन करीत. मग त्यापैकीं जर एक अधिकार हायकोर्टाकडे गेला तर दुसरा गेलाच पाहिजे. रखमाबाईस आतां सरळ मार्ग म्हटला म्हणजे आपल्या नव-यास सुधारून त्याबरोबर सुखानें नादावें. यांतच तिचें खरे शौर्य व भूषण आहे, व याप्रमाणेंच तिचे मित्र तिला सल्ला देऊन हें खूळ मिटवतील अशी आमची आशा आहे.

==


रावबहादुर रानडे यांचें अपूर्व युक्तिचापल्य


सभां वा न प्रवेष्टव्यं वक्तव्य वा समंजसम् |

--मनु:


भारती युद्धांत ज्याप्रमाणे शिखंडीस पुढे उभा करून वृद्ध पितामहास जिंकण्याचा पांडवानीं प्रयत्न केला होता, त्याप्रमाणेंच काहीं अशी पुरातन आर्यधर्माची खच्ची करण्याच्या इराद्यानें हिंदुशास्त्राकाराची स्त्रियावर सदय दृष्टि आहे असें मनांत आणून रखमाबाईंस पुढे करून तिच्या आडून आमच्या पुरातन धर्मावर गोळ्या घालण्याचें साहस सुधारकानीं मांडलें होतें, व त्यास अशी बळकट आशा होती कीं, या स्त्रीछत्राखालीं बृहन्नट्याप्रमाणे आपण सहज विजयी होऊं.पण त्याच्या दुर्दैवाने हा जो त्यांनी अखेरीचा उपाय योजिला होता त्याची व त्याबरोबरच त्यांच्या वृथामनोरथाची एकदम वाताहात झाली. भीष्माचार्याच्या


ता. ७ जून १८८७