पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो. टिळकांचे केसरींतील लेख

तीव्रशरवर्षावानें ज्याप्रमाणें एकदा अर्जुनास 'त्राहि त्राहि' करुन सोडिले होतें त्याप्रमाणेच वर्तमानपत्रातून सुधारकाच्या वर्तनाविरुद्ध जी चर्चा झाली तिच्या तापानें त्यास इतके बेहोष करून सोडिले आहे कीं, 'शेषं कोपेनपूरयेत्' या न्यायाने त्यानीं आता हवे तसें बरळण्यास सुरवात केली आहे, व आत्मसंरक्षणार्थ ज्या स्त्रीयंत्राचा यानी आश्रय केला होता त्याचा डॉ. कीर्तिकर यांनीं भंग केल्यामुळे ते परपक्षापासून आपलें रक्षण होण्यासाठीं आपल्या जुन्या मोडक्या शस्त्रांस आता साफसूफ करीत आहेत. आपला आश्रा गेला, आपलीं मतें खोटीं ठरलीं व आपला चोहोकडे उपहास झाला, हे पाहून रा. रा. वामनरावजी मोडक यांनीं आपल्या 'क्षमेस व शातीस' क्षणभर रजा दिली व रा. रा. रानडे शात व धिमेपणानेच देशकाल प्रसंगाकडे दृष्टि देऊन आपल्या गौडबंगाली वक्तृत्वाने सकल विद्वत्समूहास मोहून टकण्याचे एकवार साहस करण्यास प्रवृत्त झाले ! या त्याच्या हताश-समाधानात अनाहूत पडण्याची आम्हास काही जरूर नव्हती; पण सुधारकांच्या अग्रणीस व्यक्तिश: सदोष ठरविण्याकरिता वामनरावजीच्या व केसरींत दिलेली वचने सप्रमाण आहेत असें दाखविण्याकरिता रा. ब. रानडे यांच्या अनुक्रमे स्पष्ट व गर्भित अह्वानाने केसरीस जागृत केलें आहे. वामनरावजींच्या साधारण मुद्द्यांस गेल्या अंगात उत्तर दिलेंच आहे. हा आजचा लेख त्यानी वाचला म्हणजे त्यांचे अग्रणी स्वपक्षपुष्ट्यर्थ सत्यापलाप कसकसा करितात हें त्याचे नीट ध्यानात येईल.


विषयोपन्यास

रा. ब. नी वक्तृत्वसमारंभात जें भाषण केलें तें बहुतेक केसरीकारांस उद्देशूनच केलें होते. रखमाबाईपक्षीयानीं प्रथमत: असा एक बूट काढिला होता कीं, नव-याकडे जाण्यास बायको नाखूष असल्यास तीस जी हल्ली कोर्टातून शिक्षा होते ती आमच्या जुन्या हिंदुधर्मशास्त्राविरूद्ध असून अशा रीतीने आमचें धर्मशास्त्र कायद्यानें फिरविण्याचा सरकारने प्रयत्न करूं नये. आपला पक्ष अशा त-हेनें समर्थन करण्यांत त्याचा उद्देश काय असावा हें उघड आहे. 'आमच्या पूर्वापार चालत आलेल्या रीतीभातींत सरकारनें हात घालू नयें' असें जें आज लोकमत आहे तेंच आम्हास ग्राह्य आहे व त्याच्याच आश्रयानें आम्ही ही सुधारणा सरकारापाशी मागत आहो, असें दाखवून सुधारक लोकमत आपल्या बाजूस आणण्याचा प्रयत्न करीत होते. दुसरें, सरकारापाशीं अशा त-हेने मागणें केले असतां त्यांच्याकडूनही त्यास रूकार मिळण्याचा जास्त संभव होता. रा. ब. परवा म्हणाले की- "शास्त्राबद्दल माझा विशेष आग्रह नाहीं; वक्रृत्वांत मी जें भाषण केले तें समाज पाहून केलें होतें." रा. ब. च्या या वाक्याची जरा विशेष फोड केली असता सुधारकानीं शास्त्राची बाजू कां उचलली आहे याचा तेव्हाच उलगडा होतो. "आम्ही काहीं नवीन व्यवस्था करीत नाहीं