पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ लो. टिळकांचे केसरींतील लेख


बंदोबस्त होत नसेल तर त्यांनी खुशाल आपल्या कामाचा राजीनामा देऊन चालतें व्हावे. इ. इ."

वरील सर्व आक्षेपांस उत्तर देण्यास आम्हांस सवड नाही व आमची इच्छाही नाहीं. ज्या लोकांस - मग ते स्वधर्मी असोत अथवा परधर्मी असोत - हिंदुलोकाच्या रीतरिवाजाची बिलकुला ओळख नाहीं, किंवा असूनही जे विसरल्याचें सोंग आणतात, ज्यास कलियुगातील न्यायाधिशांच्या धर्माचें वाक्य सुचतें पण त्याबरोबरच स्त्रीधर्माचें स्मरत नाहीं, ज्यांची प्रतिभा ऋषिवर्गाच्या नक्षत्रप्रभेस लाजवून त्याच्या दृष्टीस अगोचरही विषय आत्मदृष्टि गोचर करूं शकते, ज्यास विवाहसंस्कार व गर्भाधानसंस्कारांमधील भेद कळत नाहीं व ज्याचे वेदव्यास म्हणजे मोक्षमूलर, मोनियर वुईलियम पिन्हाचार्यादि महर्षि, अशाच्या विचाराचे निदर्शन हेच त्याचे खडन होय. आमच्या स्त्रियाची उन्नाति होणें अत्यंत आवश्यक आहे हे आम्ही कबूल करतो. पण या वृथा सुधारकांस आमचें इतकेंच सागणे आहे की, ती सुधारणा अर्ध्या हळकुंडानें पिंवळी होणा-या रखमाबाईसारख्या अजाणत्या स्त्रीच्या हातून कधीही व्हावयाची नाहीं. आज हजारों पुरूष आपल्या अजाणत्या बायकाबरोबर सुखानें नादत आहेत. असे असता एका ज्ञानलवदुर्विदग्ध स्त्रीने आपला भ्रतार आपणास योग्य नाहीं म्हणून आपणास काडी मोडून द्या अशीं कोर्टांत फिर्याद आणावी ही आश्चर्याची गोष्ट नव्हे काय ? व त्याहूनही आमच्या सुधारणावाल्यानीं तिची टिमकी हातीं घेऊन त्यातून हवा तेवढा असंबद्ध प्रलाप व घोष बाहेर काढावा हें अधिक आश्चर्यकारक नाहीं काय ? इंग्रज लोकातहीं एकदां विवाह झाल्यावर, मग गर्भाधानविधि झाला असो व नसो, माझा नवरा मला आवडत नाहीं एवढ्याच कारणावरून नव-यापासून विभक्त राहण्याचा किंवा काडी मोडून घेण्याचा हक्क स्त्रीस प्राप्त होत नाहीं; व इंग्लंडात जर असा खटला उपस्थित झाला असता तर त्या स्त्रीची तिकडे छीथूच झाली असती. रखमाबाईस काय ती सवड एकढीच कीं, तिचा विवाह इकडच्या रीतीप्रमाणें लहानपणीच झाला असल्यामुळे तिची त्या विवाहास संमति घेतली नव्हती. पण आमच्या मतें यात काही अर्थ नाहीं. वधूवरांच्या संमतीनें विवाह व्हावा ही गोष्ट काही वाईट नाहीं, तथापि एकंदर परिणामाकडे लक्ष दिलें असता जेथे एकमेकाच्या संमतीने विवाह होतात तेथेंही नवराबायकोचे किती तंटे होतात हें मनांत आणिलें म्हणजे आमच्या देशांत जी आज पूर्वापार चाल चालत आलेली आहे ती बदलण्यापासून आपणास कितपत फायदा होईल याची आम्हांस शंकाच आहे. तशांत समाजाकडे लक्ष दिलें असतां त्याची आवश्यकता आज बिलकुल दिसून येत नाही. मग त्याबद्द्ल एवढी गडबड कां ? बरें क्षणभर हेंही कबूल केलें तरी पुर्वापार चाल सुधारावी कीं नाहीं, ह्याचा विचार करण्याचें हायकोर्टाचे काम नव्हे. लोकांमध्यें जी चाल असेल किंवा जो कायदा असेल त्याची अंमलबजावणी करणे हें हायकोर्टाचे कर्तव्य आहे. व लोकांत सप्तपदीक्रमणानंतर विवाह