पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ लो. टिळकांचे केसरींतील लेख

होत जातात, व त्या मानाने सामाजिक सुधारणेचें काम दुष्कर होत जातें. राजकीय विषयांची तशी गोष्ट नाही. त्यात फारसा मतभेद नाही; निदान इंग्रजांच्या अमलाखालीं सर्वांस एकच स्थिति प्राप्त झालेल्या आम्हां हिंदुस्थानांतील लोकांत तो होण्याचा संभव नसल्यामुळें पारशी, मुसलमान, मराठे, गुजराथी, सिंधी, बंगाली, मद्राशी वगैरेचीं राजकीय मतें सारखी पडतात. कित्येकदां अशा संबंधाने आम्हांत जें मतसाम्य दिसते त्याविषयी आमच्या राज्यकर्त्यास मोठा अचंबा वाटून ते त्याबद्दल नानात-हेचे कुतर्क करतात. पण ते त्याविषयीं नीट विचार करतील तर तसें साम्य दिसणें हेच स्वाभविक आहे, असे त्यांच्यापैकी जे विचारी असतील अशांच्या तरी लक्षांत आल्यावांचून राहणार नाहीं. सामाजिक सुधारणेकडे मुळींच लक्ष देऊं नये असें माझें म्हणणे नाही. कांहींनीं तिकडेही लक्ष दिलें पाहिजे, व तें त्यांच्याकडून दिलें जात आहे हें श्रीशिक्षणास, पुनर्विवाहास, बालविवाहनिषेधास, जातिभेदाभेदास व यासारख्या इतर गोष्टींस उत्तेजन येण्यासाठी जे प्रयत्न चालले आहत, व त्यांना जे थोडें फळ येऊं लागले आहे त्यावरून दिसून येईल. तथापि सर्वांनींच या मार्गाकडे वळण्याची गरज नाहीं. आ. रा. ब. म. गो. रानडे यांच्यासारखी बुद्धिमत्ता फारच थोड्यांच्या आगीं असते, यामुळें सर्व कामें सारख्या रीतींने उठविणारा त्यांच्यासारखा पुरुष फारच विरळा असतो. बहुतेक लोकाचें बुद्धिसामर्थ्य फार माफक असते. यामुळे त्याचा व्यय फार जपून केला पाहिजे सध्याच्या आमच्या देशस्थितीत विद्वान लोकाच्या बुद्धिसामर्थ्याचा बराच भाग राजकीय सुधारणेकडे व काही मात्र सामाजिक सुधारणेकडे लागला पाहिजे, असा माझा एकदरीत ग्रह झाला आहे.

माधवबागेतील सभेवरील आक्षेप.

मातंगा किमु: वल्गितै: किमफलैराडंबरैर्जम्बुका: |

सारंगा महिषा मदं व्रजत किं शून्येषु शूरा न के ||

कोपाटोपसमुद्भटोत्कटसटाकोटेरिभारे: पुर: |

सिंधुध्वानिनि हुंकृते स्फुरति यत्तद्नर्जितं गर्जितम् ||


हिंदु समाजानें माधवबागेंअ जें आपलें रौद्रस्वरूप प्रगट केलें, त्याची आमच्या अत्युत्कट साहसी सुधारकास, अथवा दुर्धारकास, पूर्वी कदाचित् कल्पनाही नसेल. समाजाची दृष्टि आपणांकडे वळली नाहीं, हे जोंपर्यंत पूर्णपणें माहित होतें तोंपर्यंत त्यांनी त्यावर अपशब्दांचा वर्षाव करून घेतला; आपले ज्ञानभांडार वर्तमानपत्रांच्या द्वारे नि:शेष बाहेर काढिलें; आपली विचारशैली व आपलें

  • (वर्ष ६, अंक ३७ १८८६)