पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधी कोण ? राजकीय कीं सामाजिक ? ३७

असतात तींसुद्धां सहज करून टाकण्यास समर्थ करते. थोरला बाजीराव व थोरला माधवराव यांच्या कारकीर्दीत मराठ्याच्या तरवारीचा पराक्रम बराच दूरपर्यंत जाऊन थडकल्यावर गृहस्थिति सुधारण्याकडे त्याचें लक्ष सहजपणें लागले, व ती होण्यास आरभही झाला होता. प्रसिद्ध ब्राह्मणवीर परशुरामभाऊ पटवर्धन यांची कन्या तरूणपणी गतभर्तुका झाली होती. तिचा पुनर्विवाह करून तिला पुन: सनाथ करावे असा त्याचा बेत होता व त्या कामास अनुकूल अशीं त्यानी ब-याच शास्त्रीलोकाचे मतें गोळा केलीं होती हे सर्वास ऐकून तरी ठाऊक असेलच. परशुरामभाऊंच्या विचारास जे प्रतिकूल होते त्यानीं मोठ्या नम्रतेनें त्याचें मन वळवून त्याच्याकडून तो विवाह होऊ दिला नाही ही गोष्ट निराळी. पण भाऊंच्या मनात तो करण्याचा एकदा सकल्प झाला, व त्याच्या म्हणण्यास पुष्कळ शास्त्र्याचा रुकारही पडला. यावरून राजकीय स्थिति सुधारली असता गृहस्थितीहि सुधारण्यास कसा आरंभ होतो, हे सर्वांच्या लक्षात येणार आहे. तसेंच, जिवबादादाशीं पेशवे ज्या रीतीनें वर्तन करीत ती रीत, सवाईमाधवरावाचा विवाह झाला तेव्हा मराठ्याना आणि मुसलमानाना एके ठिकाणीं झालेली मेजवानी, बाळाजी बाजीरावाने देशस्थ कन्येशीं केलेला विवाह, या व असल्या अनेक गोष्टीवरून माझा फार दिवसापूर्वी झालेला जो समज --- कीं पेशव्याचें राज्य आणखी काहीं वर्षे चालते तर ज्या सामाजिक सुधारणासाठीं प्रस्तुत आम्हास व आमच्या राज्यकर्त्यांस इतका त्रास पडत आहे त्या राज्यात तेव्हाच घडून येत्या-तो अलीकडे दृढ झाला आहे. दुसरी आणखी एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट अशी आहे कीं राजकीय प्रकरणी वादांत तर्काचें बरेंच प्राबल्य चालतें; सामाजिक किंवा धार्मिक वादात तो अगदी कुठित होतो. पहिल्या वादात बुद्धीवर प्रहार होत असतात; दुस-या वादात मनोविकार दुखविले जातात. बुद्धि अथवा विचारशक्ति मनोविकाराहून अधिक शांत व कमी दुराग्रही असल्यामुळें तिला तत्त्वाचा बोध लवकर होतो व तो एकदा झाला म्हणजे तदनुसार वर्तन करण्यास मनुष्यमात्र फारसा कचरत नाही. मनोविकाराची तशी गोष्ट नाहीं. वादानें ते अधिकच चेकळतात व अगदी अंध होऊन जातात. यासाठी होतां होईल तो त्याना कोणीही डिवचू नये. त्यांना जागच्या जागी थडे होऊं द्यावे. त्याच्यातली गर्मी नाहींशी झाली की ते नि:शक्त होऊन अखेरीस कापराप्रमाणें उडून जातात. त्यांचा नाश लवकर करावयाचा नसेल तर त्याना सुशिक्षणाचा किडा लावावा. म्हणजे थोड्या वर्षात त्याचें पीठ होऊन त्यांचा इमला ढासळतो. वर्तमानात्रें लोकशिक्षणाची बलवत्तर साधनें आहेत हे मी प्राजलपणें कबूल करतों. राजकीय वादास त्याच्याप्रमाणें दुस-या कोणाकडूनही साहाय्य होत नाही. तथापि त्यानीं होता होईल तों सामाजिक विषयाच्या वाटाघाटीत किंवा धर्मवादात पडूं नये, असें माझे मत आहे. वर्तमानपत्रात असल्या विषयाची चर्चा होऊं लागल्याने लोकाचे दुराग्रह अधिकाधिक बळकट