पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{संपादन सुरू आहे}

माधवबागेंतील सभेवरील आक्षेप ३९


वाक्पांडित्य निरर्गलपणें सभांतून व समाजांतून प्रगट केलें; आपली थोरवी वर्णितांना व आपल्या अप्रतिम धैर्याची, श्रेष्ठतेची, सदयतेची, परोपकारित्वाची बडिजाव मिरवताना, ते वस्तुस्थिति अगदीच विसरून गेले; व मनोराज्याच्या परमभरांत, शहाणपणांत, दूरदर्शित्वात आपण ईश्वरतुल्यच आहों, असेंही पणे त्यास बहुतेक वाटूं लागलें. "कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम्" असें आपल्या अंगी सामर्थ्य असता हिंदु समाजास आपण शेंडी धरून का वाकवू नये अशी त्याच्या मानांस साहजिकच वीरश्री उत्पन्न झाली, व त्याच्या वल्गना प्रत्यही अधिकाधिक बीभत्स स्वरूप धारण करू लागल्या; त्याची प्रकृति व प्रवृत्ति दिवसानुदिवस अधिकाधिक जाज्वल्यता प्रगट करूं लागली, व प्रत्येक वीर आत्मबहुमानानें आपल्या नावाचा डंका वर्तमानपत्रातून मिरवून सुधारकाचा अग्रणी होण्याची अत्याशा बाळगू लागला. याप्रकारें सर्वत्र निस्सीम कलकलाट उडून गेल्यावर, स्थिर व गंभीर असा आमचा हिंदु समाजही फार वेळ तटस्थवृत्ति धारण करील, हें शक्य नव्हते. त्याने अखेरीस आपलें अक्राळविक्राळ स्वरून प्रगट करण्याचा निश्चय केला. त्याची वार्ता पसरते न पसरते तोच आमच्या साहसी सुधारकाच्या तोडचे पाणी पळाले; त्याच्या शिक्ति विगलित झाल्या ! त्यांची हृदये निराशेनें पूर्णपणे ग्रासून टाकिली; व विराटपुत्र उत्तर याहूनही ज्याचा वीर्यातिरेक विशेष, असे सुधारकाचे मोहोरे, कोणी बृहन्नडा आपणास या प्राणातिक संकटातून वाचवील काय या विचारात पडले !

माधवबागेतील टोलेजंग सभेमध्ये जो ठराव होणार होता, त्यातील शब्दमात्रासही सभेत विरोध करण्याची ज्याची प्राज्ञा नव्हती, अशी ही भेकड मंडळी आतां काय् युक्ति लढवितात, हें आम्हास पाहाण्याची फार उत्कंठा होती; व त्यानी सर्वानुमतें जी अजब युक्ति काढिली ती आता जगत्प्रशिद्ध झालीच आहे, तेव्हा त्यांच्या अकलेची व धूर्ततेची वाचकास कल्पना आलीच असेल. सरकारनें हिंदुधर्मातील लग्नकार्यादि विषयात हात घालू नए, अशा अर्थाचा अर्ज करायचा हें कर्तव्या जाणून हजारो लोक एकत्र होतील, माधवबागेतील विस्तीर्ण जागेंतही मावाय्चा नाहीं, असा अफाट लोकसमुदाय जमेल, व आ. रा. सा. मंडलिक यानीं अध्यक्षस्थान स्वीकारलें असतां त्याच्या प्रसिद्ध लोककल्याणकरित्वामुळें मुंबईंतील लहान मोठे सर्व व्यापारी, कामदार, व वजनदार लोक - याच्या पक्षास बळकटी देण्याकरितां एकजूट होतील, व आजपर्यंत अपशब्द, मिथ्यारोप, व अमंगल वल्गना असह्य होईपर्यंत सहन केल्याने, प्रतिपक्ष बळावले की काय या भीतीनें, सर्व विचारी व समंजस लोक आपले विचार एकवेळ प्रगट करण्याचीही संधि घेतील, - ह्या सर्व गोष्टी जाणून, व आपली अल्पसंख्या लक्षांत आणून आमच्या उत्कट सुधारकांनी अर्जाचे अक्षरास हात न लावतां त्यांत आपलें कार्य होईल, अशा त-हेचे एक वाक्य घालण्याचा निश्चय केला व त्याबद्दल सूचना करण्याकरितां मि. तेलंग याची उठावणी केली. या सूचनेचा