पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो. टिळकांचे केसरीतील लेख

प्रमाणें शरीरसंबंध करण्यची चाल आहे, त्या लोकांमध्यें अशा संबंधापासून जी संतति होते, ती फार क्षीण व अनेक घोर व्याधीनी ग्रस्त असते, असे मुंबईतील पारशी लोकांमध्ये व मुसलमानांमध्यें पाहण्यांत आलें आहे. मुंबईतील काही श्रीमान् पारशी घराण्यांमध्यें भावाला किंवा पुतण्याला देखील मुलगी देण्याचा परिपाठ आहे; व अशा ठिकाणीं जी संतति झाले आहे, तिजमध्ये मज्जतंतूचे किंवा मेंदूचे विकार फार विलक्षण त-हेचे नेहमी आढळण्यांत येतात, असें आमच्या एका स्नेहीं डॉक्टराचें म्हणणें आहे. तसेंच शहरांतल्या शहरातच जे शरीरसंबंध घडतात, त्यापासूनही क्षीण संतति होते असें पाहण्यात आहे. याचें कारण असें की, शहरातील हवा, पाणी, आहारविहार काही निराळ्याच त-हेचे असतात, म्हणून तेथील लोकांची प्रकृति खेड्यातील लोकाच्या प्रकृतीपासून भिन्न त-हेची असते (म्हणजे शहरांतील लोकाच्या प्रकृतीमधें कांही त-हेचे दोष उत्पन्न झाले असतात). हे दोष नेहमीं तेथल्यातेथेच विवाहसंबंध केल्यानें संततीमध्यें व्रुद्धी पावतात. ह्या दोन्ही प्रकारच्या उदाहरणांवरून वरील नियम सिद्ध होतो, तो हा कीं, दोन्ही वधूवरामध्यें एकच विकार बीजदशेमध्यें किंवा परिपकदशेमध्ये असल्यास तो वंशपरंपरेनें चालण्याचा फारच संभव आहे, व तोच विकार एकांत असून दुसरा त्याजपसून मुक्त असून सुदृढ असल्यास त्याची संतति बहुधा निर्दोष असते. ह्या नियमाचा उपयोग करून घेणें असल्यास कोंकणस्थ, देशस्थ व क-हाडे याच्यामध्यें परस्परविवहसंबंध सुरू करण्याविषयीं सर्वानीं झटावें असें आमच्या देशबाधवांस आम्ही नम्रतेने सुचवितों.

* बहिष्कार

 या शब्दाचा सामान्य अर्थ सर्वास माहीत आहेच. सर्व लोकांच्या रिवाजाविरुद्ध कोणी वर्तन केल्यास त्याल लोकातून काढून टाकण्याची रीत फार पुरातन काळापसून सुरू आहे. एखादा कुजका पदार्थ जसा आपण टाकून देतों, त्द्वतच लोकांनीं आपल्या मंडळीरून दुर्वर्तन करणा-यास घालविलें पाहिजे. "समानशील्व्यसनेषु सख्यं" या न्यायाने दोन विरुद्ध वस्तूंचा कधीही समागम व्हावयाचा नाही.त्या दोन निरनिराळ्याच ठेविल्या पाहिजेत. नाहीतर एकही सुरळीत चालणार नाही. व हाच विचार मनात आणून आपल्या शास्त्रकर्त्यांनी कित्येक पातकांस सदर शिक्षा सागितली आहे. इंग्लिश ग्रंथकारानी शिक्षेचे दैविक, लौकिक व राजकीय असे जे त्रिविध भेद सांगितले आहेत,त्यांतील मधल्यात याचा अंतर्भाव होतो. यास जे धर्माचे रुप आले आहे तें केवळ आनुषंगिक

 *(वर्ष १ अक ४-११)