पान:लो. टिळकांचे केसरीतील लेख.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कोंकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे

मध्यें विकोपास जाण्याचा असा संभव असतो, तसेंच एकाच प्रातांतील किंवा हवेंतील लोकाचे विवाह्संबंध शेंकडों वर्षे तेथल्यातेथेंच घडूं लागतील तर तद्देशीय लोकाचे वर सागितलेले दोष किंवा विकार कधींही निर्मूळ व्हावयाचे नाहीत. एवढेंच नव्हे, तर ते उत्तरोत्तर वंशपरंपरेनें चालू न होता कालातरानें त्याचा समूळ नाश होण्याचा संभव आहे. वर सागितलेले दोष तद्देशीय लोकाचीच वतनें होऊन राहिलीं आहेत, याचे कारण विचारांती सहज लक्षात येण्याजोगें आहे. कल्पना करा की, काही शतकापूर्वी ब्राह्मणाची एक टोळी कोंकणात जाऊन राहिली, व दुस-या एका टोळीनें देशांत वसाहत केली. त्या वेळेस दळणवळण कमी असल्यामुळें कोकणातील लोकास देशात किवा देशावरील लोकास कोंकणात आपल्या मुली देणें फार कठीण पडे, व त्यामुळें त्यांना आपापल्यातच विवाहसंबंध करावे लागले. आतां जे लोक कोंकणांत जाऊन राहिले, त्याचे प्रकृतीवर काहीं पिढ्या लोटल्यावर तेथील हवा, पाणी, आहारविहार इत्यादिकांचा संस्कार घडून आला.
 डोळ्यांचा अधूपणा हा ह्या परिणामापैकीच. विवाहसंबंध तेथल्यातेथेंच होत असल्यामुळे, उभयस्त्रीपुरुषामध्यें एकाच दोषाचा योग जमून येऊन तो दोष वंशपरंपरेनें वाढत जाऊन काहीं पिढ्यानंतर सर्वत्र कायम होऊन राहिला. असो; याप्रमाणें निरनिराळ्या प्रातांतील लोकाच्या प्रकृतीप्रमध्यें काहीतरी एक विशेष प्रकार कायमचाच होऊन राहतो. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवंण्याजोगी ही कीं, जरी एका प्रदेशांतील लोक पुढें काही दिवसांनी दुस-या प्रदेशांत गेले तरी पुष्कळ वर्षांपर्यंत त्यांच्या मूळ प्रकृतींत फरक पडत नाही. कोकणस्थ, देशस्थ व क-हाडे असे जे तीन भेद आहेत, ते मूळारभी देशपरत्वे झाले आहेत, हे त्याच्या नावावरून उघड आहे. आरंभी हे लोक ज्या ज्या प्रदेशात होते, त्या त्या प्रदेशाच्या स्थितीप्रमाणे त्यांच्या प्रकृतीमध्यें फरक उत्पन्न झाले आहेत, व जरी साप्रत ह्या तिन्ही शाखा एकाच प्रदेशात पसरल्या आहेत, तरी बारकाईने पाहूं गेल्यास मूळारंभी देशपरत्वें उत्पन्न झालेला भेद त्यांजमध्ये अद्यापि आढळतो;व ह्या दृश्य भेदावरून त्याच्या प्रकृतींमध्येंही मूळारंभी हवापाणी इत्यादि कारणांनी उत्पन्न झालेला भेद अजून कायम असावा असें अनुमान करण्यास जागा आहे. हें जर खरें आहे, तर ह्या तिन्ही शाखांमध्यें परस्परविवाहसंबंध सुरू केल्याने शरीर सुदृढ होण्याचा किती संभव आहे बरें? ही गोष्ट वाचकाच्या मनावर चांगली ठसण्याकरिता आम्ही येथें दोन प्रकारची उदाहरणे देतो. युरोपियन व हिंदु याच्या शरीरसंबंधापासून जी युरेशियन नावाची प्रजा झाली आहे, ती मूळच्या दोन्ही जातींपेक्षां फार सुदृढ आहे असें पुष्कळाचे म्हणणे आहे. ह्या उदाहरणावरून भिन्नज्ञातीय म्हणजे भिन्नप्रकृतीच्या लोकांच्या संसर्गापासून जी संतति होते, ती सुदृढ असते, हें सिद्ध होतें. आतां याच्या उलट ज्या लोकामध्यें जवळच्या आप्ता-