पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जसे नवनीत कडकडीत। कढल कढल कढल॥२॥
या गोष्टी अवघडा। जाल्यावर सावघडा।
नावाचा चौघडा। झडल झडल झडल॥३॥
होनाजी बाळा मंथन । करिता होय विरह पतन।
अहेरनी मधी उंच रतन। जडल जडल जडल॥४॥

 लौकिक शृंगाराची साथ देणारी आहे.

 अंधारातील लावण्यांच्या संग्रहात अशा बऱ्याच लावण्या सापडतात.

 'तुम्ही नित माझे घरी यावे, सुखशयनी सुख व्हावे', अशासारखी वा 'नको टाक ओळख तुझी माझी बहुत दिसाची।आण तुला माये मासाची' या लावण्या वास्तवापेक्षा पुरुषाने स्त्रीमनाची रंगवलेली दिवास्वप्ने आहेत. त्यावेळची सामाजिक परिस्थिती यातून थोडीफार ध्यानात येते. त्याकाळी प्रत्येकाची एक दोन अंगवस्त्रे असावीत. थोरामोठ्यांच्या नाटकशाळा असत. त्यामुळे त्या काळात ही लावणी जास्त लोकप्रिय होती.

 निपुत्रिकेची तक्रार, बिजवर पती, पतीची निर्भत्सना, पेहेलवान पती, परस्त्रीरत पुरुष, व्याभिचारिणीचा शृंगार असे अनेक विषय लौकिक शृंगारिक लावण्यात पाहायला मिळतात.
 लावण्याचे विषय पाहायला गेले, तर कितीतरी आढळतात. विविध विषयावर प्रसंगापरत्वे शाहिरांनी लावणी रचना केली आहे. तमाशाचा फडात लावणीकार सुरवातीला गण किंवा गणाची लावणी म्हणत. ते दैवताला नमन असे. त्याशिवाय कार्यक्रमाची सुरवात होत नसे.

 लावणीकार कोणत्याही पंथाचा असला, तरी गणेशवर्णनपर गण म्हटल्याशिवाय कार्यक्रम सुरू करत नसत. प्रत्येक शाहिराने अशा गण रचना केल्या आहेत. त्यात इतर देवतांचे उल्लेखही येत. होनाजीचा गण प्रसिद्ध आहे.

श्री वक्रतुंड गणपती, गणाधिपती, तुझी जे स्तुति
नर निशिदिनी करती, ते नर निरविघ्न प्रपंची जग विचरती
चौदा विद्येचा सिंधू प्रबळ हा अक्षय अचल दिनबंधु
अढळ हा स्वानंदनभीचा इंदू अढळ हा लागता लक्ष त्त्वारूपी
नाम साक्ष की, भाव साक्षपी, जड मूढ उद्धरती
शिवपुत्र चरित्र चोखटे, नित्य जो पढे, सकळ संकटे हरती

 या गणापासन सुरू झालेला तमाशा मग इतर लावण्याकडे वळतो. देवतांची स्तोत्रे गाताना शाहिरांनी स्वत: त्यांच्या वर्णनपरही लावण्यांची रचना केली आहे. देवतांच्या स्तुतींची वर्णने केली आहेत. परशुराम शाहिरांनी तर दहा अवतारांची लावणी सादर केली. दहावा कलंकी अवतार असेलोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ४३॥