पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून मादक पदार्थ आहेत, तितके पूजेला आणायला लागतात व गुरुदक्षिणा आणि जेवणावळ मिळून ५० रु. खर्च येतो.'
 आता नुसत्या पोतराजाच्या व्यवसायावर उदरनिर्वाह होणे अवघड झाले आहे. त्यांची मुले शिक्षित होऊन नोकरी-धंदा करू लागली आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस पोतराज दुर्मिळ होत जाणार आहेत.आताही शहरी भागात मुलांना दाखविण्यासाठीही कडकलक्ष्मीचे रूप दुर्मिळच आहे. खेडोपाड्यात क्वचित आया लहान मुलांना कडकलक्ष्मीची भीती घालत. आता तेही संपू लागले आहे. एकनाथ महाराजांनी प्रबोधनात्मक लिहिलेल्या भारुडात पोतराजावरचे 'दार उघड बया!' हे भारूड प्रसिद्ध आहे. त्याने लोकांच्या ज्ञानाची कवाडं उघडी केली आहेत.
 पण तरीही लोकसंस्कृतीमधला पोतराज, इतक्या सहजासहजी विसरता येणार नाही. काही काळात त्याचं महत्त्व होतंच. देवीच्या भक्तात त्याचं स्थान अढळ आहे. देवीचा महिमा त्याच्याविना पूर्ण होत नाही. त्याचं चित्र संस्कृतीच्या चौथऱ्यावर चिरंजीव आहे आणि त्याचबरोबर देवी महिमा वर्णणारं त्याचं गीतही

लक्ष्मीआई! तुझं लेणं काई
पांढरं पातळ, हिरवी चोळी
लिंबाचं नेसणं, देवात बसणं!

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ १२६ ।।