पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संबूदेव बोले  'गिरजा, लबाडी नकं घेऊ'
सोंगट्याचा डाव  आला एकमेकी
गिरजा नार पक्की  संबूदेवाचं डोळं झाकी!
भोळ्या शंकराचा  त्येच्या खेळाच्या छंदामंदी
गिरीजा नारीन  त्येचा जिंकून नेला नंदी!
रूसला संबूदेव  जाऊन डोंगरी घाली धूप
पितींची गिरजानार घेती भिलीणीचं रूप!
रूसला संबूदेव  जाऊन डोंगरी घाली धूनी
पिर्तीची गिरजा नार  बोले तूमावाचून नाही कुणी!
रूसला संबुदेव  जाऊन बसला तळ्याकाठी
पिर्तीची गिरजा नार  घाली जाऊन गळ्या मिठी!

 हे खरं तर शंकर-पार्वतीचं प्रीतीगीतच आहे; पण पोतराजानं आपल्या साध्या सोप्या शब्दांत कथेतून मांडलं आहे. ते ऐकताना लोकही रमून जात असतात. इतर स्थानमहात्म्य त्यात कोल्हापूर, नाशिक वगैरीचीही गीतं पोतराजाची आहेत. माता, पिता, सूर्य, पाच पांडव, सात आसरा, नवनाथ, दहा अवतार अशा विषयावरही त्यांची गीते आहेत. सरोजिनी बाबरांच्या ‘एक होता राजा' मध्ये अशी बरीच गीते त्यांनी संपादित केली आहेत.

 पोतराजाचं दक्षिणेत फार माहात्म्य होतं. तिथं तर मरिआईच्या जत्रेत रेडाबळीसुद्धा दिला जात असे. ग्रामदैवतेचे तुष्टीसाठी अशी प्रथा असावी. आधी देवीला रेडा सोडत. तो गावभर फिरत असे. नंतर योग्य मुहर्तावर त्याचा बळी देत. त्याचे शीर ग्रामदेवतेसमोर पुरले जात असे. महाराष्ट्रात काही ठिकाणी देवीच्या समोर मेंढराचा बळी दिला जात असे. मांढरदेवीच्या यात्रेतही अगदी परवापर्यंत असा बळी दिला जाई. आता ती प्रथा बंद झाली आहे. काही ठिकाणी पोतराज देवीसमोर असा मेंढराचा बळी देई व त्या मेंढराचे रक्त स्वत: घटाघट प्राशन करी, असे उल्लेखही आढळतात; पण या उग्र प्रथा हल्ली मागे पडू लागल्या आहेत. मरिआईचा गाडा गावाबाहेर नेणे वगैरे प्रथाही आता क्वचितच दिसून येतात. आता समाजप्रबोधन घडत आहे. साथीच्या रोगाचे उच्चाटन होत आहे. देवी रोग तर नाहीसा झालेला आहे. साथीच्या रोगाची मूळ कारणे लोकांना समजली आहेत. मरिआईच्या कोपामळे हे रोग उद्भवत नाहीत आणि तिच्या उपासनेने ते कमी होत नाहीत. त्यासाठी औषधोपचारांची योजना करावी लागते. हे लोकमानसाच्या ध्यानी येत चालले आहे, त्यामुळे पूर्वी वंशपरंपरेने होणारा पोतराज व्यवसायही कमी झाला आहे. पूर्वी पोतराज होण्यासाठी दीक्षा दिली जाई. त्याचाही समारंभ असे. 'गावगाडा'कार अत्रे यांनी म्हटले आहे, की 'पोतराज करताना भांग, गांजा, अफू, दारू वगैरे जितके

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। १२५ ॥