पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

नत्य-गायन करायची. मुरळीही नृत्य गायन करते, त्यानुरोधाने ती खंडोबाची भक्त समजून खंडोबाच्या दासींना 'मुरळी' नाव प्राप्त झाले असावे. वाघ्या-मुरळी यांच्या जागरणात नृत्य-गीत-वादन याचा समन्वय असतो. मुरळीचे नृत्य म्हणजे थोडेफार पाहणाऱ्यांना बेभान करून गुंतवून ठेवणारे असते. तिच्या पायात धुंगरू असतात. हातात घंटा घेऊन ती नाचते. वाघ्ये हातात तुणतुणे वा दमडीसारख वाद्य घेतात व मुरळीच्या नृत्याला साथ देतात. मधूनच भंडारा उधळतात आणि तोंडानं 'हाब् हाब् ' म्हणतात.
 मुरळीची गाणी पाहिली, की बरीचशी त्याची रचना लावणीसारखी वाटते कारण त्यातला ठेका व शृंगारपरिपोषक शब्दरचना कुठेतरी लावणीचा पाया असावा, असे वाटते.

वय सोळा, कोवळी काया, हडपणात घुंगरू पाया,
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया
पोर बावरी झाली पहा जेजुरीला जाया॥
नव्या नव्या वाऱ्याने हिचे भारावले अंग,
या अशा वयातच बदलू पाहे ढंग,
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया॥

 यात सोळाव्या वयातल्या तारुण्याचा आविष्कार, शरीरातले घडू पाहणारे बदल आणि मल्हारीच्या भेटीची आतुरता व्यक्त झाली आहे.
 वाघ्या-मुरळीच्या गाण्यात मल्हारी- बानू, म्हाळसाची कथा येते. त्यांची भेट, भांडण, संसार यांची वर्णने येतात. मुळात सवतीची भांडणं हा सगळ्यांचा श्रवणीय विनोदी विषय. लोक आनंद घेत, हसत गीते ऐकतात.

ह्या बाई जेजुरी नगरीत। कोऱ्या चांदणी महालात
म्हाळसा बानाई भांडती। ऐकून मल्हारी हासती।
सवती सवतीचे भांडण। भोळ्या भक्ताचे कांडण ।
दोघी मुरळी नाचती। बघून मल्हारी हासती।
पंढरीचे आहे रखुमाई। येथे म्हाळसा बानाई।
तिथे विटेवरी उभा। येथे घोड्यावर शोभा।
तेथे पुंडलिक निधान। येथे हेंगडी प्रधान।
तेथे बुक्क्याचे रे लेणे। येथे भंडार भूषणे।
तेथे वाहे चंद्रभागा। येथे जटी वाहे गंगा।
तेथे मृदंग विना टाळ। येथे वाघ्या मुरळीचा घोळ॥

लोकसंस्कृतीचा गाभारा ।। ११५ ।।