पान:लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचानालय सातारा .

खाता हांडीचा म्हणजे देहाचा उपभोग घेणे. बकऱ्यापुढे देव कापणे म्हणजे विषयासक्त मनाचा बळी परमेश्वरापुढे न देता देवाचाच बळी घेणे. माणूस विकाराच्या आधीन व्हायला लागला, की सगळं उलटं घडत जातं. नाथांनी हेच तर कुटात्मक भारुडातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
 नेहमीचे लोकमानसात साजरे होणारे होळी-शिमगा वगैरेसारखे सण फुगडी, पिंगा, हमामा, हूतूतू सारखे खेळ याच्या माध्यमातून ही नाथांची भारुडे पाहावयास मिळतात. नाथांची प्रतिभा किती विविध विषयांना स्पर्श करते व त्यातून समाजाला जागं करण्याचा प्रयत्न करते, हेच यातून समोर येत.
 फुगडी भारुडातली रचना करताना शब्दांनासुद्धा नादाचा घेरा प्राप्त झालाय, असं वाटत,

फु फु फु फु फुगडी गे। दोघी घालू झगडी गे।
जाऊन महाद्वारी गे। तेथे घालीन फुगडी गे॥१॥
दोन्ही हस्तक धरून गे। तेथे घालीन फुगडी गे ।
विटेवरील पाऊल येऊगे। राहो माझ्या हृदयी गे।
जेथे वैष्णवांचा भार गे। तेथे घालीन फुगडी गे॥२॥
जेथे नामघोष गे। तेथे करीन झगडीगे।
एका जनार्दनी पाहन गे। मन माझे धाले गें॥३॥

 ज्या ठिकाणी वैष्णव नामघोष करतात, तिथं घातलेली ही भाव-भक्तीरूप अविरत नामाची फुगडी आहे. या खेळाला दोन जणी लागतात. म्हणून मग भाव-भक्ती यांनी मिळून हा खेळ मांडला आहे आणि तो विठ्ठलाच्या महाद्वारात मांडला आहे.
 'शिमगा' या भारुडात त्यांनी 'शिमगा' या रूपकाचा वापर मोठा गमतीशीर केला आहे.

सत्त्व गाठी उमगा। तेणे सफळ होईल शिमगा।
तुम्ही हेच गाणे गा। तुम्ही हसू नका॥

 सत्त्व गुणाचा उदय करून ज्ञानाग्नीने चहूशुन्याची होळी पेटवून हरिनामाची बोंब प्रत्येक अवस्थेत मारली पाहिजे.

जागोजागी थांबा। अवघ्या मिळोनि मारा बोंबा।
न जळे एरंडाच्या कोंबा। तुम्ही हसू नका, हसू नका।
गावचा पाटील कोळी। काळोबाची पिकली पोळी।
तुमची पाजळू द्या होळी। तुम्ही हसू नका, हसू नका।
ओटीत घेऊनी गुलाल। सख्या मेहुणी संगे भुलाल।
तिचा नवरा मोठा जलाल। तुम्ही हसू नका, हसू नका।।

 मनावर सतत ताबा ठेवला पाहिजे, नाहीतर माणूस मग काळरूपी यमाचे खाद्य होईल. याकरिता

लोकसंस्कृतीचा गाभारा ॥ ९९ ॥