पान:लोकहितवादी.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी व “माला" कार. आत्मनिंदेने तरुण पिढीचा किंबहुना सर्व राष्ट्राचा तेजोभंग करितात; त्यांच्या या बड्या अपराधाबद्दल निबंधमालेचे कित्येक अंक खर्ची घालून शास्त्रीबोवांनी “ लोकहितवादीं"ना आपल्याकडून अगदी चीत केले आहे. "लांकहितवादीं"च्या मनांत व आचारांत थोडीशी जुन्याची झांक असून प्रार्थना-समाज, थिऑसफी, दयानंदांचा आर्यसमाज इत्यादी नवीन मतांची थोडीथोडी झांकही त्यांत चमके, च मनांत आलेले विचार व्यक्त करण्याची त्यांची पद्धत थोडीशी सडेतोडपणाची व लहरीची असल्यामुळे त्यांच्या मतांच्या विविधपणाला थोडेसे विचित्रपणाचेही स्वरूप येत असे. या कारणाने त्या वेळीही ती मते लोकांना आवडेनाशी होत होती. त्यांतच मालाकारांच्या जोरदार टीकेची भर पडल्यामुळे ती मतें खरोखरच चीत झाली असे त्या पिढीला वाटले. व ही स्थिती आज जवळ जवळ एक पिढीपर्यंत टिकली. गेल्या दहापांच वर्षात तिच्यांत थोडासा फरक पडलेला आहे. लोकहितवादींच्या विचारसरणीत घेण्यासारखे पुष्कळ आहे; त्यांची तत्कालीन लोकस्थितीची मीमांस फारशी चुकलेली नव्हती; त्यांचे बोलणे अप्रीय असले तरी खरेपणाचे व मनापासूनचे होते असें नवीन पिढीतील पुष्कळ विचारवान आणि निःपक्षपातीपणाने विचार करणाऱ्या माणसांना वाटते. उलटपक्षी मालाकारांची टीका नुरचुरीत, खमंग व चवदार असल्यामुळे तिचे सेवन त्या पिढीने उत्कंठेने केले. आजही केवळ भाषेच्या दी पाहिले तर ते लेख वाचनीयच आहेत. पण विचारापेक्षां विकाराचीन लाप त्यांत जास्त दिसते असे वाटावयाला लागल्यामुळे नुसत्या चवदार भाषेची किंमत तितकी वाटत नाही. मात्र तशा प्रकारच्या भाषेमलें त्या विचारांचे वळण तरुण पिढीला लवकर लागले व त्याचा अतिरेक पुढील पिढीत बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे झाला.