पान:लोकहितवादी.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. एकदोन पिढ्या गोष्टी पाहण्याची संवय झाल्यामुळे नजरेला वळण तेंच लागले, डोळे तिकडेच कलले, व त्यांना एकप्रकारचा हेकटपणा आला, असा जो पुस्तक वाचतांना वाचकाचा ग्रह होतो तेंही एक कारण-अनेकांपैकी एक असेल–पण बरेंच बलवत्तर असें कारण हे पुस्तक मागे पडण्याला झाले, असे वाटते. "लोकहितवादी" यांची खास मते या वरील लेखसंग्रहांतून ग्रथित झालेली आहेत. याशिवाय नोकरीत असतांना ज्या ज्या ठिकाणी राहण्याचा त्यांना प्रसंग आला त्या त्या ठिकाणी व्याख्याने, निबंध, चर्चा अशा अनेक रूपांनी ते आपल्या मतांचे प्रतिपादन करीत. त्यामुळे त्यांची मते कोणती, याची शंका कोणाला कधी आलीच नाही. इतकेच नव्हे, तर अमूक अमूक प्रकारची मते म्हणजे लोकहितवादींच्या सारखी मतें असें वर्णन केले तर ते पुरेसें व्हावे इतकी प्रसिद्धी त्या मतांना, त्या विचारसरणीला मिळालेली होती. यामुळे कदाचित् असेल, पण विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी आपल्या नवीन विचारांचा पुरस्कार करण्याकरितां जेव्हां निबंधमाला काढिली, त्यावेळी मागिल्या पिढीचे निदर्शक म्हणून त्यांना निवडून त्यांच्यावर टीकेची झोड उठविली असावी असे वाटते. शास्त्रीबुवांचे लोकहितवादींवर मुख्य आक्षेप असे आहेत की, यांना आपल्या संस्कृतीचे पुरेसे ज्ञान व तिचा पुरासा अभिमान नाही. आपल्या लोकांची राज्ये गेली याची इतर कारणे कांही आहेत की नाहीत याचा विचार न करितां, आपले आचारविचारच चुकीचे, समाजांत शिस्त नाही, अशा त-हेने सर्व दोष आपल्याच अंगावर ओढ़न घेऊन हे स्वजनांची निंदा करितात; इंग्रजांच्या राजकीय सामर्थ्यामुळे यां वे डोळे दिपले आहेत, व इंग्रजी राज्य, इंग्रजी संस्कृती यांकडे यांचा फाजोल ओढा अशा प्रकाराने हे-व या पिढीतील इतर लोक