पान:लोकहितवादी.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शतपत्रे व स्वाध्याय. नव्याचे मंडन लोकहितवादींनी कोणत्या प्रकाराने केले आहे ते समजते. त्याचप्रमाणे दोहींची तुलना करूं लागलं म्हणजे पहिल्यातशतपत्रांत-अर्थात्च ती मूळची पत्रं आहेत व त्यांचा लेखनकाल १८५० च्या सुमाराचा आहे ही गोष्ट लक्ष्यात ठेविली पाहिजे-एक. प्रकारचा सरळपणा, मनाला येईल तें भाडभीड न धरतां सांगण्याची प्रवृत्ती व लोकहिताविषयी कळकळ हे गूण पूर्णपणे प्रत्येक ओळींत भरले आहेत असे वाटते. दुसऱ्यांत हा ग्रन्थ उत्तर वयांत, शांतपणीं, आणि ग्रंथ म्हणून लिहिला ही गोष्ट लक्षात घेतली तर-सरळपणा व कळकळ या गोष्टी आहेतच, पण त्याचेबरोबर अनेक प्रकारच्या माहितीची जोडही झालेली दिसते व एवढ्या लहानशा पुस्तकांत इतकें भांडार सांठविले आहे व तेही अगदी सहजासहजीं लीलेने, याचे मोठे कौतुक वाटते. “स्वाध्याय" म्हणजे जुन्या कल्पनेप्रमाणे ब्राह्मणाला अवश्य असणारे सर्व ज्ञान या पुस्तकांत थोडक्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर त्याच्यावरील टीका व त्याच्या जोडीला नवीन ज्ञान कोणते पाहिजे तेंही परिशिष्टांतून दिले आहे. पण या कौतुकाच्या बरोबर दुसरा एक विचार मनांत येतो तो असा की, थोडीशी कशलतेची व विनोदीपणाची जोड मिळाली असती तर बरेच ठिकाणी पुनरावृत्ती वाटते ती टळून व सरळपणाचे पर्यवसान हेकेखोरपणांत होते आहे की काय, अशी जी शंका मधून मधून वाचकांच्या मनांत चमकते ती न चमकता,पुस्तकाच्या विचारसरणीत थोडासा जास्त गोडपणा,थोडेसें जास्त माधुर्य आले असते. स्वाध्याय हे पुस्तक फार मागे पडले आहे ते का? पुस्तक टाकाऊ आहे म्हणून, कां निबंधमालाकारांनी आपली कुन्हाड पोरपणाने याला दुसरें नांव मला तरी सुचत नाही-पांढरे केस झालेल्या लोकहितवादींच्या डोक्यांत घातली म्हणून ? ही दोन्ही कारणे खरी नाहीत-निदान मला तरी ती पुरेशी वाटत नाहीत--एकाच नजरेनें