पान:लोकहितवादी.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ लोकहितवादी. ____“येथपर्यंत पुराणांपासून या देशावर आलेल्या अनर्थांचें-अज्ञानप्रसारांचें-वर्णन यथार्थत्त्वेकरून केले. तरी त्यांतील गुणांविषयीं स्तब्ध राहणे हे अधमपणाचे होईल असे आमचे मत आहे. पुराणांतील पुष्कळशी वर्णने म्हणजे कवींची लापिका किंवा रसभरीत काव्य एवढी खूणगांठ मनाशी बांधिली म्हणजे पुराणांचा उद्देश ईश्वराचे ठिकाणी मनुष्यांची भक्ती वाढवावी असाच होता असे म्हणणे भाग आहे. वाद एवढाच की, मुख्य गोष्टी कोणत्या व अलंकारभूत कोणत्या याचे भान कवींना व वाचकांना दोघांनाही न राहिल्यामुळे खऱ्याचे खोटे होऊन घोटाळा झाला आहे. तरी देखील अज्ञानी लोक, स्त्रिया, मुले वगैरे यांच्या समोर पुराणांनी स्त्रीपुरुषांच्या चारित्र्याचे चांगले आदर्श पुष्कळच ठेविले व त्यामुळे हिंदुस्थानांतल्या स्त्रियांइतक्या सदाचरणी, धार्मीक, विनम्र, पापभीरू, सुशील अशा स्त्रिया इतर देशांत सांपडणार नाहीत......... "....सर्वांनी विचारपूर्वक पुराणांतील तत्त्वार्थाचे ग्रहण केल्यास पुराणांनी एकंदरीत लोकांवर उपकारच केले आहेत असे म्हणावें लागेल. धर्माचे सौलभ्य पुराणांनी करून दिले. तोच क्रम त्यांतील रहस्य ओळखून प्राकृत साधुसंतांनीही चालू ठेविला. पण हे सर्व आज लोपलेले आहे. पुराणांचे खरें तत्त्व व त्यांचा खरा उपयोग जेव्हां लोक समजू लागतील तेव्हांच ते व त्यांचा देश उर्जितावस्थेस येईल व कल्पित कलिपाशांतूनही ते मुक्त होऊन ऐश्वर्याप्रत पावतील." खास लोकहितवादींची मते ज्यांत स्पष्टपणे प्रतिपादन केलेली आहेत असे ' शतपत्रे' व ' स्वाध्याय 'हे ग्रंथ-एक अगदी पूर्व वयांतील, पहिलाच–व दुसरा जवळ जवळ अखेरीच्यापैकी एकघेऊन त्यांतील मुख्य मुख्य भागांचा खुलासा येथपर्यंत केला आहे. हे दोन्ही ग्रंथ जोडीनेच वाचिले पाहिजेत. म्हणजे जुन्याचे खंडन व