पान:लोकहितवादी.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोकहितवादी. श्यकताच नाही. प्रीतीजन्य पदार्थ असला म्हणजे तो आपणच सर्वांचा अंतःकरण आपणांकडे ओढून घेतो. तद्वत् देशामध्ये प्रीत्युत्पादक चालीरीती उत्पन्न झाल्या म्हणजे लोक सहज देशप्रीती व देशाभिमान बाळगतील. आमच्या देशांतून स्वदेशप्रीतीचे व पूर्वजांच्या अभिमानाचें बीजच नाहीसे झाले आहे, यास वर लिहिल्यापैकीच काही तरी कारणे असावी. ज्यांनी सतीची चाल बंद केली, पुनर्विवाह सुरू केला, स्त्रीशिक्षण चालू केलें व अनेक विद्याशाळा स्थापिल्या त्यांनी देशप्रीतीरूप वृक्षाचे बीज रुजत घातले असे म्हणावयास काही हरकत नाही." अशा त-हेची प्रस्तावना करून स्वाध्यायांत ज्यांचा अंतर्भाव होतो ती वेदवेदांगें,शास्त्रपुराणे, स्मृती, मंत्रतंत्राचे प्रकार वगैरे गोष्टींची माहिती ग्रंथाच्या आरंभी दिली आहे. ही माहिती सांगून झाल्यावर एवढाच स्वाध्याय असेल तर हे ज्ञान आमच्या आजच्या गरजांना किती व कसकसें अपुरे आहे हे प्रत्येक ठिकाणी टीका करून दाखविले आहे. शेवटीं: मूळ ग्रन्थाहूनही मोठी अशी परिशिष्टें जोडिली आहेत; त्यांत पुराणांचा बाष्कळपणा, पुनर्विवाह, पतितपरावर्तन, भिक्षुकी वगैरे अनेक विषयांवर मार्मीक पण प्रचलित लोकमताला अगदी विरुद्ध असे विचार कित्येक ठिकाणी सौम्य भाषेत, बऱ्याच ठिकाणी वाचकांच्या व विशेषतः पुराणमताभिमानी वाचकांच्या मनाला झोंबेल अशा भाषेत; पण सर्वत्र अत्यंत कळकळीने व स्पष्टपणाने आणि केवळ लोकांचे होत व्हावे ही एकच भावना मनांत धरून व्यक्त केलेले आहेत. आणि शेवटी स्वाध्याय म्हणजे आज उपयोगी पडणाऱ्या सर्व विद्यांचें अध्ययन अशी व्यापक व्याख्या करून इतिहास, राज्यकारभार, कायदेकानू, राजनीती, उद्योगधंदे, शिक्षण वगैरे अनेक विषयांवरील माहिती व त्यासंबंधाने आपले विचार लोकहितवादी यांनी व्यक्त केले आहेत. या परिशिष्टांतून